Vaishnavi Hagawane Case Pune : वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनं राज्याला हादरवलं. सासरच्या लोकांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून वैष्णवीने हे टोकाचं पाऊल उचललं अशी शक्यता आहे. त्यानंतर आता या प्रकरणात आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. कारण आता मृत वैष्णवीची जाऊ म्हणजे शशांक हगवणेच्या मोठ्या भावाच्या पत्नीनेही तसेच आरोप केले आहेत. मयुरी सुशिल हगवणे यांनीही हगवणे कुटुंबावर असेच गंभीर आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> धुळ्यात ज्याच्या खोलीत कोट्यवधी सापडले, तो खोतकरांचा PA नेमका कोण? किशोर पाटीलची हिस्ट्री
माझ्या नवऱ्यालाही मारहाण केली...
मयुरी हगवणे यांनीही जानेवारीपासून हगवणे यांचं घर सोडलं आहे. त्या म्हणाल्या, 2022 मध्ये माझं सुशिल हगवणे यांच्यासोबत लग्न झालं होतं. माझी ननंद, दीर आणि सासू हे मला कायम टॉर्चर करत होते. माझ्या सासूने कधी माझे लाड केले तर ननंद बोलायची, तू का लाड करतेय. तू त्यांच्यासोबत असं करू नको. पण या सर्व गोष्टीमध्ये त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजे सुशिल हगवणेंनाही मारहाण झाली. कारण सुशिल नेहमी माझी बाजू घ्यायचे. आम्ही दीड वर्ष झालं, वेगळं राहत होतो. माझ्या नंदेने आणि दिराने माझ्या चारित्र्यावर संशय घेतला. आम्हाला घर नाही मिळू दिलं. दीर आणि सासरे माझ्या नवऱ्याला जमीन नाही मिळू द्यायचे. आम्ही त्यांच्या पाया पडावं असं त्यांना वाटायचं. पण आम्ही नाही गेलो.
मी तक्रार केली, तेव्हा ते प्रकरण दाबलं...
मी नोव्हेंबरला त्यांची तक्रार दिली होती. 8:30 वाजता मी पौड पोलीस स्टेशनला गेले. पण पोलिसांनी 9:30 पर्यंत काहीच तक्रार घेतली नाही. तक्रार करू नका असं म्हणत तिथल्या महिला अधिकाऱ्यांनी दबाव आणला. नंतर फरार झाले आणि माझ्या भाऊ आणि आईविरोधात तक्रार केली.
हे ही वाचा >> रूममध्ये कोट्यवधींची रोकड, बाहेर ठाकरेंचे शिवसैनिक... धुळ्याच्या रात्री काय घडलं? A टू Z स्टोरी
मयुरी पुढे म्हणाली, "वैष्णवीसोबत मला कुणी बोलू द्यायचे नाही. तिला बोलायचंच नाही असं म्हणायचे. माझे मिस्टर म्हणायचे वैष्णवीला त्रास देऊ नका, तेव्हा सासू म्हणायची तू शांत बस. वैष्णवीला मारण्यात आल्याचं घरातल्या काम करणाऱ्या लोकांनी सांगितलं. वैष्णवी सासऱ्याकडे, दीराकडे बघते असं म्हणत शशांत हंगवणे संशय घ्यायचा. तिला त्रास नको म्हणून आम्हीही कधी बोलायचो नाही."
मयुरीच्या आईनेही केले गंभीर आरोप
मयुरी हंगवणे यांच्या आई म्हणाल्या, "मी सासूला सांगितलं होतं त्रास देऊ नका. मारहाण झाली, त्यादिवशी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि तक्रार केली. पण त्यांनी दबाव टाकून त्यांनी ते दाबलं. पण ते मोठे लोक असल्यानं त्यांचं काही चाललं नाही. माझी मुलगी काय आणि वैष्णवी काय दोन्ही माझ्याच मुली होत्या."
माझ्या मिस्टरांना सांगितलं होतं की, तू मुयरीला सोडून दे. आम्ही तुला दुसरी मुलगी बघू. तुला पैशात खेळवू असं सांगून त्याला तोडायचा प्रयत्न केला. पण माझ्या नवऱ्याने सांगितलं, तसं काही करणार नाही. मी तुम्हाला सोडेन पण मयुरीला सोडणार नाही असं मयुरी सुशिल हगवणे म्हणाल्या आहेत.
ADVERTISEMENT
