'तुझ्या किडनीत स्टोन आहे..', हे शब्द ऐकून तरूणीने केलं भलतंच काही अन् अवघं कुटुंब हादरलं

जानकीला किडनी स्टोनचा त्रास होता. काही दिवसांपासून तिला खूप वेदना होत होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी तिला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता.

Mumbai Tak

मुंबई तक

23 Jun 2025 (अपडेटेड: 23 Jun 2025, 03:21 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

गरिबीमुळे उपचार घेणं शक्य नाही झालं

point

अखेर तरूणीने स्वत:ला संपवलं

उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली. शोहरतगढ़ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोहरिया बुजुर्ग गावात आर्थिक अडचणींमुळे एका तरूणीनं टोकाचं पाऊल उचललं. आर्थिक अडचणींमुळे उपचार न मिळाल्याने तीव्र वेदनांनी त्रस्त झालेल्या 15 वर्षीय मुलीने आत्महत्या केली. मृत मुलीचं नाव जानकी असं आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> मुलाला दारूचं व्यसन, बापानेच डोक्यात दगड घातला, मृतदेह लपवण्यासाठी दुसऱ्या मुलाची...घटना काय?

जानकीला किडनी स्टोनचा त्रास होता. काही दिवसांपासून तिला खूप वेदना होत होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी तिला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, जानकीचे वडील अत्यंत गरीब असल्यानं त्यांना उपचारासाठी लागणारा खर्च जमा करता आला नाही. स्थानिक लोकांनी सांगितलं की, जानकीला असह्य वेदना होत होत्या. त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती. सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे तिचा मानसिक समतोल बिघडला होता.

आंब्याच्या बागेत झाडाला लटकलेले आढळला मृतदेह 

शनिवारी संध्याकाळी जानकी गावाजवळील आंब्याच्या बागेत गेली. तिथे तिनं एका झाडाच्या फांदीला कपड्याचा फास बनवून गळफास घेतला. काही गावकऱ्यांनी तिला झाडाला लटकलेल्या अवस्थेत पाहिलं आणि तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या जानकीच्या वडिलांनी आपल्या मुलीची अवस्था पाहून हंबरडा फोडला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.

हे ही वाचा >> भयंकर! कॅन्सरग्रस्त आजीला नातवानेच कचऱ्यात सोडलं, उपचारासाठी पोलिसांनी रुग्णालयांचे 9 तास उंबरे झिजवले

दरम्यान, या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे. आर्थिक तंगीमुळे उपचार न मिळाल्यानं एका तरुण मुलीला आपलं जीवन संपवावं लागलं. यामुळे गरीबी आणि आरोग्य सुविधांच्या अभावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून, मृत्यूच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. 

    follow whatsapp