अकोला: इंस्टाग्रामवर LIVE व्हिडीओ बनवत बाटलीतून विष प्राशन केलं अन्... 18 वर्षीय तरुणाने असं का केलं?

अकोल्यात एका 18 वर्षीय तरुणाने इंस्टाग्रामवर LIVE व्हिडीओ बनवत टोकाचा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे. त्या तरुणाने भावनिक मॅसेजसह एक व्हिडिओ पोस्ट केला आणि काही वेळातच तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

18 वर्षीय तरुणाने असं का केलं?

18 वर्षीय तरुणाने असं का केलं?

मुंबई तक

• 01:10 PM • 23 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

इंस्टाग्रामवर LIVE व्हिडीओ बनवत बाटलीतून विष प्राशन केलं अन्...

point

10 वर्षीय तरुणाचा टोकाचा निर्णय

point

अकोल्यातील धक्कादायक घटना

Akola News: अकोल्यात एका 18 वर्षीय तरुणाने इंस्टाग्रामवर LIVE व्हिडीओ बनवत टोकाचा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित तरुणाने प्रेमसंबंधाच्या कारणातून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या तरुणाने भावनिक मॅसेजसह एक व्हिडिओ पोस्ट केला आणि काही वेळातच तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. 

हे वाचलं का?

हा व्हिडिओ व्हायरल होताच, मुंबई सायबर सेल आणि अकोला कंट्रोल रूमने तात्काळ तरुणाच्या मदतीसाठी धाव घेतली. मिळालेल्या माहितीच्या आधारे, पीडित तरुणाच्या ठिकाणाचा शोध घेण्यात आला आणि संबंधित व्हिडीओ तसेच तरुणाच्या लोकेशनची माहिती दहीहांडा पोलीस स्टेशन ठाण्यात देण्यात आली. 

हे ही वाचा: फलटण हत्याकांड: पत्नीने पती आणि प्रियकरासोबत मिळून रचला कट अन् दुसऱ्या प्रियकराची निर्घृण हत्या! मृतदेहाचे तुकडे नदी-तलावात...

बाटलीतून विष प्राशन केलं अन्... 

कृष्णा रघू पल्वी अशी 18 वर्षीय पीडित तरुणाची ओळख समोर आली असून तो मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असल्याची माहिती आहे. व्हिडीओमध्ये तो तरुण विषाच्या बाटलीतून विष प्राशन करताना दिसत आहे. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच, दहीहांडा पोलिस ठाण्याचे एसएचओ सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ ढोले यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आलं. पोलीस, सायबर सुरक्षा पथक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या समन्वयाने काटी-पाटी ते डोनवाडा परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली. सुमारे 20 मिनिटांनंतर, डोनवाडा गावातील अजय झटाळे यांच्या शेतात तो तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळला. 

हे ही वाचा: काँग्रेस खासदाराच्या पुतण्याने केली पत्नीची हत्या, त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून संपवलं आयुष्य, 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

वेळेवर झालेल्या उपचारामुळे वाचला जीव... 

पोलीस आणि कुटुंबियांनी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या तरुणाला अकोला जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर, डॉक्टरांनी वेळेवर उपचार सुरू केल्यामुळे पीडित तरुणाचा जीव वाचू शकला. सध्या, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेतील पोलिसांच्या माहिती आणि तात्काळ कारवाईमुळे एक तरुणाचा जीव वाचला. दरम्यान, कुटुंबियांनी मुंबई सायबर सेल, अकोला नियंत्रण कक्ष आणि दहीहांडा पोलिसांचे आभार मानल्याचं सांगितलं जात आहे. 

    follow whatsapp