भाच्याच्या प्रेमात मामी झाली वेडीपिशी! फ्रिज रिपेअर करण्यासाठी घरी जायचा..एक दिवस झाला मोठा कांड!

Shocking Love Story Viral News :  उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये मामी-भाचाचं प्रेमप्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रागावलेली मामी भाच्याच्या घरी गेली आणि त्याच्या आई-वडिलांना असं काही सांगितलं की, सर्वांच्या पायाखालची वाळूच सरकली.

Extra Marital Affaire Shocking News

Extra Marital Affaire Shocking News

मुंबई तक

21 Jun 2025 (अपडेटेड: 21 Jun 2025, 09:32 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन भाच्याच्या प्रेमात पडली मामी!

point

प्रेमात आंधळी झालेल्या मामीने पोलीस स्टेशनमध्ये केला राडा..

point

त्या घरी नेमकं घडलं तरी काय?

Shocking Love Story Viral News :  उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये मामी-भाचाचं प्रेमप्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रागावलेली मामी भाच्याच्या घरी गेली आणि त्याच्या आई-वडिलांना असं काही सांगितलं की, सर्वांच्या पायाखालची वाळूच सरकली. दिल्लीला राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेच्या पतीचा मृत्यू तीन वर्षांपूर्वीच झाला होता. पतीचा भाचा, जो मेरठा दौराला कस्बे परिसरात राहायचा. हा अल्पवयीन भाचा मामीकडे एसी-फ्रिजच्या रिपेरिंगचं काम शिकण्यासाठी यायचा. पण या महिलेनं म्हणजेच त्याच्या मामी स्वत:ला तिच्या भाचाची पत्नी असल्याचं सांगत आहे.

हे वाचलं का?

प्रेमात आंधळी झालेल्या मामीने पोलीस स्टेशनमध्ये केला राडा..

मिळालेल्या माहितीनुसार, भाचा जेव्हा मामीच्या घरी यायचा. त्याचदरम्यान मामी आणि भाच्यात जवळीक वाढली. घरच्यांनी त्या मुलाला मामीकडे काम शिकवण्यासाठी पाठवलं होतं. पण याच महिलेनं अल्पवयीन भाच्याला लाईफ पार्टनरच करून टाकला. पण काही आठवड्यांपूर्वी किशोर त्याच्या घरी पोहोचला. तेव्हा त्याच्या घरच्यांना तो बदलल्याचं कळलं. त्यानंतर त्याला घरीच ठेवलं.

हे ही वाचा >> महिलेचा बेडरुममध्ये रंगला होता रोमान्स, अचानक पती आला अन् नको तेच...

पण प्रेमात आंधळी झालेल्या मामीला हे सहन झालं नाही. तिला जेव्हा कळलं की, किशोर आता तिला भेटू शकत नाही, ते थेट मेरठला त्याच्या घरी पोहोचली. घरच्यांनी विरोध केल्यानंतर ती महिला थेट पोलीस स्टेशनला पोहोचली. पोलिसांच्या समोर तिने स्पष्ट म्हटलं, आता हा माझा भाचा नाही, माझा पती आहे. मला त्याच्यासोबतच राहायचं आहे. महिलाच्या या जबाबामुळे पोलिसही चक्रावले.

हे ही वाचा >> मध्यरात्री प्यायला बसले अन् अचानक मित्रांमध्ये वाद अन् थेट दगडाने...

मेरठचे एसपी सिटी आयुष विक्रम सिंगने म्हटलं की, मुलाचं वय 16 वर्ष आहे. तो अल्पवयीन आहे. हे प्रकरण पोक्सो कायद्यांतर्ग येतं की नाही, हे त्याचा जन्मदाखला पाहून स्पष्ट केलं जाईल. जर तो अल्पवयीन असल्याचं समोर आलं, तर महिलेवर गंभीर गुन्हा दाखल केला जाईल. दरम्यान, मामी-भाच्याच्या या भयानक प्रेम प्रकरणामुळे त्यांच्या कुटुंबियांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

    follow whatsapp