मध्यरात्री प्यायला बसले अन् अचानक मित्रांमध्ये वाद अन् थेट दगडाने...
crime news : अकोला शहरात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. मित्राने मित्राचीच हत्या केल्याची घटना अकोल्यातील रमाबाईनगर येथील आहे. त्याच्या जवळच्या मित्राने निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

बातम्या हायलाइट

अकोला शहरात खळबळ

मित्राने मित्राचीच केली हत्या
Maharashtra Crime news : अकोला शहरात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. मित्राने मित्राचीच हत्या केल्याची घटना अकोल्यातील रमाबाईनगर येथील आहे. प्रकाश पंचू जोसेफ (वय 35) अशी हत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पवन विलास मोरे उर्फ टकल्या असे आरोपीचे नाव असून तो सध्या फरार आहे. या घटनेमुळे घटनास्थळी भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
हेही वाचा : 3 कोटींचा बंगला विकण्याचा पतीचा निर्णय, डॉक्टर बायकोने बॉयफ्रेंडला हाताशी धरलं अन् कट रचत...
नेमकं काय झालं?
संबंधित प्रकरणात, प्रकाश आणि पवन हे दोघेही जीवलग मित्र होते. मंगळवारी रात्री रमाबाई नगर चौकात दोघेजण एकत्र दारू पीत होते. दरम्यान, त्यांच्यात क्षुल्लक कराणावरुन वाद झाला आणि वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. पवन उर्फ टकल्याने अचानकपणे रागाच्या भरात प्रकाशवर दगडफेक करत मारहाण केली. या हल्ल्यात प्रकाश गंभीर जखमी झाला होता.
स्थानिक नागरिकांनी तातडीने प्रकाशला नजीकच्या रुग्णयालयात उपचारासाठी पाठविले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आहे. घटनेनंतर पवन मोरेनं घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासात घटनेची माहिती मिळवली. यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपासणी सुरू केली.
पुणे, बीड प्रमाणे अकोल्यातही वाढती गुन्हेगारी
पुणे, बीडप्रमाणेच आता अकोल्यातही वाढती गुन्हेगारी दिसू लागली आहे. अकोट फैल भागात एका व्यक्तीची हत्या झाली. तर घटनेत दोघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेमागे किरकोळ वाद कारणीभूत आहे. यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. संबंधित प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा : पैशांचा माज, बड्या बापाच्या लेकीनं मर्सडिझनं दुचाकीला दिली धडक, पती-पत्नी दोघेही हवेत फेकले...
मुलगा चोर असल्याच्या संशयाने मारहाण आणि मृत्यू
दरम्यान, आता नांदेडमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका निष्पाप तरुणाला चोर समजून बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत तरुण मृत पावला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू होता. आणि नंतर तो मुलगा चोर नसल्याची माहिती समोर आली आहे.