3 कोटींचा बंगला विकण्याचा पतीचा निर्णय, डॉक्टर बायकोने बॉयफ्रेंडला हाताशी धरलं अन् कट रचत...
Crime News : एका डॉक्टर पत्नीने आपल्या प्रियकराच्या साथीने नवऱ्याची हत्या केली आहे. नवरा 3 कोटीचा बंगला विकत असल्याची माहिती पत्नीला होताच पत्नी नाराज झाली आणि यातूनच हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीने कट रचत नवऱ्याला दारू पाजली आणि हत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या

कारण ऐकून चक्रावून जाल
Crime News : उत्तराखंडमधील कोटद्वारा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका डॉक्टर पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली आहे. नवरा 3 कोटीचा बंगला विकत असल्याची माहिती पत्नीला होताच पत्नी नाराज झाली आणि यातूनच पतीची हत्या करण्यात आली. पत्नीने कट रचत नवऱ्याला दारू पाजली आणि हत्या केली. यानंतर मृतदेह जंगलात फेकून देण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा : पैशांचा माज, बड्या बापाच्या लेकीनं मर्सडिझनं दुचाकीला दिली धडक, पती-पत्नी दोघेही हवेत फेकले...
नेमकं काय घडलं?
रविंद्र कुमार वय वर्षे 56 असे व्यक्तीचे नाव आहे. ते मुरादाबाद येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तर रिना सिंधू वय वर्षे 36 असे आरोपी पत्नीचं नाव आहे. तसेच परितोष कुमार वय 33 असे तिच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे. आरोपी प्रियकर हा बिजनौर जिल्ह्यातील नागीना येथील सुराई पुरानी गावातील रहिवासी आहे. रविंद्र कुमार यांचे मुरादाबाद येथे रामगंगा विहारच्या पॉश कॉलनीत एक बंगला होता.
तो बंगला विकण्यावरून रविंद्र कुमारची हत्या करण्यात आली. रविंद्र कुमारच्या या बंगल्याची किंमत ही 3 कोटी रुपये आहे. या बंगल्यात दरमहा चांगले भाडे मिळत होते. त्यामुळे त्याचा आर्थिक फायदा हो असल्याने पत्नी रिना ही बंगला विकण्यास विरोध करत होती.
अशावेळी तिची ओळख परितोष कुमार नावाच्या व्यक्तीशी झाली. तो रिनाच्या क्लिनिकमधील पेशंट होता. दोघांमध्ये चांगली जवळीकता वाढली. मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर हे प्रेमसंबंधात झाले.