Love Story Shocking Viral News : काही लोक प्रेमात आंधळे होऊन असे कृत्य करतात, ज्यामुळे त्यांचीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाची बदनामी होते. अशाच प्रकारचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशच्या अलिगढमध्ये ही घटना घडली आहे. हे तेच अलिगढ आहे, जिथे सासू तिच्या जावयासोबत पळून गेली होती. यावेळीही असाच काहीसा प्रकार उघडकीस आला आहे. पण आता मामी 12 वर्ष लहान भाच्यासोबत पळून गेली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण हरदुआगंज विभागातील एका गावातील आहे. येथील तीन मुलांची आई असलेल्या महिलेचं तिच्या दीराच्या मुलासोबत प्रेम जडलं. 34 वर्षांच्या या महिलेचं 12 वर्ष लहान असलेल्या भाच्यासोबत प्रेम जडलं. मागच्या महिन्यात ही महिला तिच्या पतीशी भांडण करून माहेरी गेली होती. त्यानंतर ती दोन मुलांना सोबत घेऊन भाच्यासोबत पळून गेली.
तीन वर्षांपासूनच बायकोचा भाच्यासोबत अफेअर...
इटावली येथील रहिवासी जयरामने म्हटलंय, वर्ष 2013 मध्ये त्याचं लग्न अकराबाद येथील एका महिलेसोबत झालं होतं. आम्हाला दोन मुली आणि एक मुलगा आहे. तीन वर्षांपूर्वी माझ्या बायकोचा भाच्यासोबत अफेअर सुरु होता. 23 मे रोजी माझ्या भाच्याने माझ्या पत्नीला माहेरी घेऊन जाण्याच्या बहाण्याने पळवून नेलं. त्यानंतर मला याबाबत समजलं आणि मी पोलिसांत तक्रार दाखल केली.
त्या लव्ह स्टोरीमुळं उडाली खळबळ
पीडित व्यक्तीने बाल कल्याण समितीला पत्र लिहून म्हटलंय, पत्नीला पळवून नेण्यात त्याच्या भाचा आमि मोठ्या बहिणीचा हात आहे. याप्रकरणी हरदुआगंजचे एसओ धीरज कुमार यांनी म्हटलं की, हे प्रकरण महुआखेडा पोलीस ठाणे विभागातील आहे. पतीने म्हटलं, माझ्या बायकोला माझ्या सोबत राहायचं असेल, तर मी त्याला माफ करायला तयार आहे. जर ती नाही राहीली, तर तिची मर्जी..पण मुलांना मी माझ्यासोबत ठेवेल. माझ्या मुलीला मारहाण करण्यात आलीय. त्यामुळे मी मुलांन पत्नीजवळ ठेऊ देणार नाही.
ADVERTISEMENT











