महिला फिजियोथेरापिस्टने पेशंटलाच पटवलं! नंतर पत्नीने काढला पतीचा काटा; हत्या केल्यानंतर घडलं असं काही..

Love Story Shocking News : उत्तराखंडच्या कोटद्वारामध्ये रस्त्याच्या बाजूला सापडलेल्या अज्ञात मृतदेहामुळे खळबळ माजली आहेत. पौडी पोलिसांनी 15 दिवसांच्या कसून तपासानंतर या रहस्यमय हत्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे

Uttarakhand Shocking Love Story

Uttarakhand Shocking Love Story

मुंबई तक

• 10:27 PM • 20 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

उत्तराखंडमध्ये धक्कादायक घटनेमुळं खळबळ

point

3 कोटीच्या संपत्तीसाठी पतीची हत्या, प्रियकरासोबत..

point

त्या गावात नेमकं घडलं तरी काय?

Love Story Shocking News : उत्तराखंडच्या कोटद्वारामध्ये रस्त्याच्या बाजूला सापडलेल्या अज्ञात मृतदेहामुळे खळबळ माजली आहेत. पौडी पोलिसांनी 15 दिवसांच्या कसून तपासानंतर या रहस्यमय हत्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. मृत रविंद्र कुमारची पत्नी रीना सिंधु आणि तिचा प्रियकर परितोष कुमार या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचं समोर आलं. दोघांनी मिळून रविंद्रला दारू पाजली आणि फावड्याने हल्ला करत त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाला कोटद्वारच्या दरीत फेकून दिलं.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, 5 जूनला कोटद्वारच्या दुगड्डा मार्गावर रस्त्याच्या बाजूला एक अज्ञात मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबळ माजली. रविंद्र कुमार असं मृत व्यक्तीचं नाव आहे. पौंडी पोलिसांनी तातडीनं तपास सुरु केला आणि 15 दिवसांच्या चौकशीनंतर या हत्या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली. तपासात समोर आलं की, रविंद्रच्या हत्येचा कट त्याची 34 वर्षीय पत्नी रीना सिंधू आणि 33 वर्षीय प्रेमी परितोष कुमारने रचला होता. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

हे ही वाचा >> Rain Update: जगबुडीचा कहर, रत्नागिरी गेलं पाण्याखाली.. पुराचं पाणी पाहून तुम्हालाही भरेल धडकी

3 कोटीच्या संपत्तीसाठी पतीची हत्या, प्रियकरासोबत..

रिना मुरादाबादच्या रामगंगा बिहार, सिव्हिल लायन्स भागात राहत होती. तर परितोष बिजनौरच्या नगीना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराय पुरैनी गावातील रहिवासी आहे. पोलिसांच्या तपासात रिनाने हत्येची धक्कादायक माहिती समोर आणली आहे. तिने म्हटलंय की, रविंद्र आणि तिचा मुरादाबादमध्ये तीन मजली दुकान होत. याची किंमत जवळपास 3 कोटी रुपये होती. रविंद्र या दुकानाला विकून त्याचा कर्ज फेडणार होता. परंतु, रिना या दुकानाच्या विक्रीच्या विरोधात होती.

त्यामुळे अनेकदा त्यांच्यात वाद होत होते. याचदरम्यान रिनाची ओळख फिजियोथेरपी सेंटरमध्ये पेशंट बनून आलेल्या परितोष कुमारशी झआली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध वाढले. 31 मे रोजी रीनाने रविंद्रला बिजनौरच्या नगीनामध्ये परितोषच्या घरी बोलावलं. तिथे दोघांनी रविंद्रला दारू पाजली आणि पुन्हा परितोषने फावड्याने त्याच्या गळ्यावर आणि छातीवर वार केले. त्यानंतर दोघांनी रविंद्रचा मृतदेह कारमध्ये टाकला आणि कोटद्वारच्या दुगड्डा जंगलातील दरीत फेकला. 17 जूनला राजेशने कोटद्वार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

हे ही वाचा >> हॉटेलमध्ये मोठा कांड! खिडकीवर पडदा नव्हता, लोकांनी सगळंच पाहिलं..कपलचा प्रायव्हेट Video लीक

    follow whatsapp