pune bengaluru expressway : कोल्हापूर-डोंबिवली ट्रॅव्हलला पुण्यात ट्रकची धडक, 4 ठार

मुंबई तक

23 Apr 2023 (अपडेटेड: 23 Apr 2023, 04:07 AM)

पुण्यातील नवले पुलाजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. यात 4 जणांचा मृत्यू झाला, तर 18 प्रवाशी जखमी झाले. 31 टन साखर पोती घेऊन निघालेला ट्रक बसवर मागून आदळला.

4 dead, 18 injured in A truck carrying 31 tons of sugar sacks collided with a bus from behind near Narhe Ambegaon in Pune

4 dead, 18 injured in A truck carrying 31 tons of sugar sacks collided with a bus from behind near Narhe Ambegaon in Pune

follow google news

पुण्यातील नवले पुलाजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. यात 4 जणांचा मृत्यू झाला, तर 18 प्रवाशी जखमी झाले. 31 टन साखर पोती घेऊन निघालेला ट्रक बसवर  पाठीमागून आदळला.

हे वाचलं का?

पुणे बंगळुरू महामार्गावर शनिवारी मध्यरात्री (23 एप्रिल) 2.17 वाजता भीषण अपघात झाला. कोल्हापूरहून डोंबिवलीला येणारी ट्रॅव्हल म्हणजे खासगी बस आणि साखराची पोती घेऊन निघालेल्या ट्रकची धडक झाली. नऱ्हे आंबेगाव भागातील नवले पुलाजवळ असलेल्या स्वामी नारायण मंदिराजवळ हा अपघात झाला. यात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 18 प्रवाशी जखमी झाले आहेत.

हेही वाचा >> उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद कसं गेलं?, अजित पवारांनी सांगितली Inside Story

मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरहून ट्रॅव्हल बस डोंबिवलीच्या दिशेने येत होती. बसमध्ये 25 प्रवाशी होते. पुणे-बंगळुरू महामार्गावरून बस रात्री दोन वाजेच्या सुमारास पुण्यातील नवले पुलाजवळ येताच साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या मालवाहून ट्रकने पाठिमागून ट्रॅव्हलला जोराची धडक दिली.

भरधाव मालवाहू ट्रकने ट्रॅव्हल बसला धडक दिली. त्यानंतर दोन्ही वाहने पलटी झाली. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून, 18 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

ट्रॅव्हल बस-ट्रक अपघात, अग्निशमन दलाकडून रेस्क्यू

अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात पुणे बंगळुरू महामार्गावर नऱ्हे-आंबेगाव येथील स्वामी नारायण मंदिराच्या उतारावर एक मोठा मालवाहतूक करणारा ट्रक आणि खाजगी बस यांचा अपघात झाला असून काही लोक अडकले आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर पुणे महानगरपालिकेची 4 अग्निशमन वाहने व 1 रेस्क्यु व्हॅन व पीएमआरडीएकडून 1 रेस्क्यु व्हॅन अशी एकुण 7 अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली.

घटनास्थळी पोहोचताच अपघातग्रस्त दोन्ही वाहने पलटी झाल्याचे दिसताच दलाचे अधिकारी व जवानांनी प्रथमत: बसच्या मागील बाजूची काच फोडून व काही जवानांनी वरील बाजूस जाऊन दोरीच्या सहाय्याने जखमी प्रवाशांना बाहेर काढले.

पुढील बाजूस काही महिला व पंधरा वर्षाची मुलगी अडकली होती. जवानांनी जिकरीचे प्रयत्न करीत जखमी अवस्थेत मुलीला बाहेर काढले. अग्निशमन दलाकडून एकुण 18 जखमींना बाहेर काढले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले.

हेही वाचा >> 14 श्री सदस्य मृत्यू: ‘तो अधिकारी स्वच्छ आणि प्रामाणिक, पण बॉससमोर…’ पवार असं का म्हणाले?

अधिक माहिती घेतली असता, खाजगी बस (एमएच 03 सीपी 4409) नीता ट्रॅव्हल्स कंपनीची असून कोल्हापूर ते डोंबिवली असा प्रवास करीत होती. मालवाहतूक करणारा मोठा ट्रक (एमएच 10 सीआर 1224) यामध्ये मोठ्या प्रमाणात साखरीची पोती होती.

    follow whatsapp