Maharashtra Weather Today : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये पावसासह वादळी वारे वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल रविवारी कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती.
ADVERTISEMENT
पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नंदूरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाजही बांधण्यात आला होता. अशातच आज महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कसं असणार आहे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,दक्षिण कोकण-गोवा आणि मराठवाडा जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा >> Ind vs Pak : भारतीय सैनिकांनी पाकिस्तानची नांगी ठेचली! 40 सैनिकांना केलं ठार, DGMO काय म्हणाले?
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, सांगली, सोलापूर, जालना, छत्रपती संभाजी नगर, बीड, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळमध्ये 30-40 किमी प्रति वेगाने वादळी वारे वाहू शकतात.
कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट परिसर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियामध्ये 50-60 किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहू शकतात. तर भंडारा, गोंदियासाठी कोणत्याही प्रकारचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला नाही.
हे ही वाचा >> 10 वी चा निकाल DigiLocker वर जाऊन करा डाऊनलोड, यासाठी सविस्तर बातमी वाचा
ADVERTISEMENT
