RRB ALP: रेल्वेच्या लोको पायलट पदासाठी नवी भरती; अर्जाची शेवटची तारीख काय?

रेल्वे बोर्डाकडून (RRB) असिस्टंट लोको पायलट पदासाठी (RRB ALP Recruitment 2025) भरती जाहीर करण्यात आली आहे.

रेल्वेच्या लोको पायलट पदासाठी नवी भरती

रेल्वेच्या लोको पायलट पदासाठी नवी भरती

मुंबई तक

• 01:57 PM • 12 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

रेल्वेच्या लोको पायलट पदासाठी नवी भरती

point

अर्जाची शेवटची तारीख काय?

point

कसा आणि कुठे कराल अर्ज?

RRB ALP: रेल्वे बोर्डाकडून (RRB) असिस्टंट लोको पायलट पदासाठी (RRB ALP Recruitment 2025) भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे होती, जी आता 19 मे 2025 पर्यंत लांबवण्यात आली आहे. जे इच्छुक विद्यार्थी अजूनही अर्ज करू शकले नाहीत, त्यांच्यासाठी आता अप्लाय करण्याची ही चांगली संधी आहे. 

हे वाचलं का?

या भरतीसाठी rrbcdg.gov.in या अधिकृत वेबसाइटवर किंवा rrbapply.gov.in/#/auth/landing या ऑफिशियल पोर्टलवर जाऊन फॉर्म भरू शकता. 

नवीन तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2025
अर्जाचे शुल्क भरण्याची शेवटची तारीख 21 मे 2025
फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख 22 मे ते 31 मे 2025

ALP पदासाठी पात्रता

असिस्टंट लोको पायलट भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असण्यासोबत आयटीआय (ITI) पास होणं आवश्यक आहे किंवा याऐवजी 10 वी उत्तीर्ण असण्यासोबत इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमाची डिग्री प्राप्त करणं गरजेचं आहे. यासोबतच परीक्षार्थीचं किमान वय 18 वर्षे असावे आणि कमाल 30 वर्षे असावे. ओबीसी (OBC) प्रवर्गासाठी उच्च वयोमर्यादेत 3 वर्षे  तसेच एससी (SC)/ एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षे सूट दिली जाईल. यासोबतच, इतर राखीव प्रवर्ग आणि माजी सैनिकांनाही नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

हे ही वाचा: Maharashtra SSC Board Result 2025: मोठी बातमी, महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, 'या' दिवशी पाहता येईल निकाल

अर्जाची प्रक्रिया

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत पोर्टलवर जा. 
यानंतर अप्लाय बटणावर क्लिक केल्यावर क्रिएट अॅन अकाउंटवर क्लिक करा आणि आवश्यक डिटेल्स भरा. 
यानंतर 'Already have an account' वर क्लिक करून बाकीच्या सर्व डिटेल्स भरून फॉर्म पूर्ण करा. 
शेवटी निर्धारित शुल्क जमा करून फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट काढून सुरक्षितरित्या ठेवा. 

हे ही वाचा: मोठी बातमी! विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटला राम राम, BCCI चे प्रयत्न निष्फळ

अर्जाचे शुल्क

अर्ज भरण्यासोबत प्रवर्गनिहाय शुल्क जमा करणे बंधनकारक आहे. शुल्काशिवाय तुमचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही. इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 500 रुपये आणि एससी/एसटी/माजी सैनिक/ट्रान्सजेंडर/ईबीसीसाठी 250 रुपये आहे.

    follow whatsapp