मोठी बातमी! विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटला राम राम, BCCI चे प्रयत्न निष्फळ
Virat Kohli Retired : काही दिवसांपासून विराट कोहली हा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची चर्चा आहे. रोहित शर्माने नुकताच निवृत्ती घेतल्यानंतर विराटनंही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

रोहित शर्मानंतर विराट कोहलीनं केली निवृत्तीची घोषणा

टीम इंडियाची रनमशीन रिटायर्ड

विराट कोहलीचे चाहते नाराज
Virat Kohli Retired : रोहित शर्मानंतर आता टीम इंडियाचा रनमशीन विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, बीसीसीआयने रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीला थांबवण्यासाठी अनेकदा प्रयत्न केला. मात्र, बीसीसीआयचा प्रयत्न अंतिम क्षणी फोल ठरला आहे.
हेही वाचा : वाळू माफियांना पकडायला गेलेल्या तहसीलदारावर ट्रक्टर घालण्याचा प्रयत्न, हवेत फायरींग केल्यामुळे...
नुकत्याच झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने म्हणावी अशी कामगिरी केली नाही. त्याने केवळ 25 हून कमी सरासरीने धावा केल्या. 8 पैकी तो 7 वेळा ऑफच्या दिशेला आऊट झाला होता. त्यामुळे त्याला अनेक चाहत्यांनी ट्रोलही केलं होतं.
त्याने याच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत 9 डावांमध्ये 90 रन्स केल्या होत्या. गेल्या 5 वर्षांमध्ये त्याने 37 कसोटी सामने खेळत 3 शतके केली. काही महिन्यांआधी विराटने टी 20 मधून निवृत्तीची घोषणा केली होत. त्यामुळे आता विराट कोहली आणि रोहित शर्मा हे केवळ वनडे क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहेत.
विराटची भावनिक पोस्ट
गेल्या 14 वर्षांमध्ये मी ब्ल्यू जर्सी परिधान केली आहे. खरं सांगायचं झालं तर या फॉरमॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागणार याची मी कल्पना केली नव्हती, असं त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं.
हेही वाचा : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल आज होणार जाहीर? वेळ काय असेल, जाणून घ्या एका क्लिकवर
कसोटी फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी काही गुण असतात. हा खेळ शांतपणे, संयमाने खेळावा. त्यामध्ये अनेक क्षण असतात ते कायमच आपल्यासोबत असतात, अशी भावना त्यानं व्यक्त केली.
कसोटी फॉरमॅटमधून बाहेर पडणे सोपे नाही, पण माझा हा योग्य निर्णय आहे. माला जे देता येईल ते मी देण्याचा प्रयत्न केला. मला माझ्या अपेक्षेहून बरंच काही मिळालं आहे. मी कसोटी क्रिकेटला आणि कारकिर्दीला हसतमुखाने पाहिल.