वाळू माफियांना पकडायला गेलेल्या तहसीलदारावर ट्रक्टर घालण्याचा प्रयत्न, हवेत फायरींग केल्यामुळे...

मुंबई तक

या कारवाईत तहसीलदारांच्या पथकाने 11 लाख 10 हजार रुपये किमतीचे रेताने भरलेले दोन ट्रॅक्टर जप्त केले. तहसीलदार विजय चव्हाण यांच्या तक्रारीवरून गोंदी पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जालन्यामध्ये वाळू माफियांचा हैदोस

point

वाळू माफियांवर कारवाईला गेलेल्या तहसीलदाराला चिरडण्याचा प्रयत्न

Jalna Crime News : अंबड तहसीलच्या शाहगड येथे गोदावरी नदीकाठी वाळू माफियांनी हैदोस घातला आहे. अशातच  या माफियांनी अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. अवैध वाळू खननाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदार आणि त्यांच्या पथकावर हा हल्ला झाला. 

हे ही वाचा >> पाकिस्तानमध्ये तब्बल 51 ठिकाणी हल्ले, बलोच आर्मीने म्हटलं आता आम्ही...

तहसीलदारांनी केला हवेत गोळीबार

तहसीलदार विजय चव्हाण यांना शाहगड परिसरात गोदावरी नदीकाठावरून अवैध वाळू उत्खनन आणि तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे चव्हाण आणि त्यांचे पथक कारवाईसाठी घटनास्थळी पोहोचले. यावेळी वाळू माफियांनी तहसीलदारांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी चव्हाण यांनी हवेत गोळीबार केला, त्यानंतर माफिया घटनास्थळावरून पसार झाले.

दोन ट्रक्टर जप्त, आरोपींविरोधात गुन्हा

या कारवाईत तहसीलदारांच्या पथकाने 11 लाख 10 हजार रुपये किमतीचे रेताने भरलेले दोन ट्रॅक्टर जप्त केले. तहसीलदार विजय चव्हाण यांच्या तक्रारीवरून गोंदी पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोंदी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. वाळू माफियांच्या या दहशतीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, प्रशासनाने कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp