Maharashtra SSC Board Result 2025 : दहावीच्या परीक्षेचा हा उद्या (13 मे 2025) रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल हा जाहीर केला जाईल. जे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत सामील झाले आहेत. ते त्यांचे निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि sscresult.mahahsscboard.in वर पाहू शकता.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून घोषित केला जाईल. यामध्ये पासिंट टक्केवारी, उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या आणि डिव्हिजननुसार रिझल्टबाबत माहिती दिली जाईल. याशिवाय या लिंकच्या माध्यमातून त्यांचा निकाल तपासू शकतात. तस खाली दिलेल्या या स्टेप्सच्या माध्यमातून रिझल्ट पाहू शकतात. यावर्षी दहावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारीला सुरु झाली आणि 17 मार्च 2025 ला संपली. परीक्षा दोन टप्प्यात म्हणजेच सकाळी 11 ते 2 आणि दुपारी 3 ते 6 दरम्यान घेण्यात आली.
हे ही वाचा >> Maharashtra SSC Board Result 2025: मोठी बातमी, महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, 'या' दिवशी पाहता येईल निकाल
Maharashtra Board च्या अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in वर लॉग इन करा.
होम पेजवर दिलेल्या “Maharashtra SSC Result 2025” लिंकवर क्लिक करा.
नवीन पेज सुरु झाल्यावर तुमचे लॉग इन माहिती भरा.
सबमिट बटणावर क्लिक करा.
स्क्रीनवर तुमचा रिझल्ट दिसेल.
निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यासाठी त्याची प्रिंट काढा.
हे ही वाचा >> मोठी बातमी! विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटला राम राम, BCCI चे प्रयत्न निष्फळ
मागील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये SSC चा निकाल 27 मे रोजी जाहीर झाला होता. त्यावेळी 15.60 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेत नोंदणी केली होती. ज्यामध्ये जवळपास 15.49 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यापैकी 95.81 टक्के लोकांना या परीक्षेत यश मिळालं होतं. मुलींची पासिंग टक्केवारी 97.21 टक्के आणि 94.56 टक्के ही मुलांची पासिंग टक्केवारी होती. कोकण डिव्हिजनने 99.01 ट्क्के इतका निकाल लागला होता. तर नागपूर डिव्हिजनमध्ये सर्वात कमी 94.73 इतका रिझल्ट लागला होता.
ADVERTISEMENT
