Viral Story: रंगीबेरंगी मासे आणि निळाशार समुद्रासाठी प्रसिद्ध असलेलं मालदीव हे जवळपास प्रत्येक पर्यटकाचं स्वप्नातील ठिकाण आहे. येथील स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग सारख्या अॅक्टिव्हिटीज पर्यटकांना थरारक वाटतात. परंतु कधीकधी हे साहस घातक ठरू शकतं. अलीकडेच एका 26 वर्षीय चिनी महिलेला मासिक पाळीच्या वेळी समुद्रात पोहण्यासाठी जाणं महगात पडल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
मासिक पाळीत समुद्रात पोहण्याचा निर्णय
26 नोव्हेंबर 2025 रोजी, मालदीवमधील एका बेटावर स्कूबा डायव्हिंगचा कोर्स करणाऱ्या एका महिलेने ऑनलाइन माध्यमातून सल्ला घेतला आणि मासिक पाळीच्या वेळी डायव्हिंग करणं सुरक्षित आहे का? याबद्दल तिने विचारलं. तिथे उपस्थित असलेल्या अनेकांनी महिलेला हा धोका न पत्कारण्याचा सल्ला दिला तर काहींनी तिला टेम्पॉन वापरून पाण्याखाली डायव्हिंग करणं सुरक्षित असल्याचं सांगितलं. महिलेने तिच्या मासिक पाळीच्या दरम्यान पोहण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही काळानंतर तिला तिच्या या निर्णयाचा पश्चात्ताप झाला.
हे ही वाचा: एक्सप्रेस वेवर कारमध्ये सुरू असलेल्या शारीरिक संबंधाचा Video नेमका कसा झाला रेकॉर्ड?
शार्क आकर्षित झाले अन्...
महिलेने तिच्या मासिक पाळीच्या काळात पोहायला सुरुवात केली. मात्र, तिच्या शरीरातून येणाऱ्या रक्ताच्या वासाने शार्क्स आकर्षित झाले. शार्कचा एक ग्रुप तिच्याजवळ आला. महिलेच्या मासिक पाळीमुळे पाण्यात थोडेसे रक्त पडलं आणि ते शार्कच्या असामान्य वासाच्या संवेदनासाठी पुरेसं होते. शास्त्रज्ञांच्या मते, शार्क लाखो पटीने जास्त संवेदनशीलतेने रक्ताचा वास घेऊ शकतात. महिलेला इंस्टाग्रामसाठी फोटो काढायचा होता, म्हणून ती शार्कच्या जवळ पोहत गेली. पण अचानक, एका शार्कने तिच्यावर हल्ला केला आणि तिच्या डाव्या मनगटाला चावा घेतला.
हे ही वाचा: मुंबई: दहशतवादी प्रकरणात अडकवण्याची धमकी, बनावट क्राइम ब्रांच अधिकारी अन्... तब्बल 9.30 लाख रुपये उकळले
शार्कच्या हल्ल्यामुळे झालेली जखम इतकी खोल होती की त्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यावेळी, वेदनेनं ओरडणाऱ्या महिलेला एका टूर गाईडने लगेच पाण्यातून बाहेर येण्यास सांगितलं, पण त्यासाठी तिने नकार दिला. तिला तिच्या सोशल मीडियासाठी आणखी फोटो काढायचे होते. जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिने तिच्या मैत्रिणींना शार्कच्या हल्ल्याचे फोटो पाठवले, त्यानंतर काहींनी तिला जखमेकडे दुर्लक्ष केल्याने संसर्ग होऊ शकतो आणि अंगविच्छेदन (amputation) चा धोका उद्भवू शकतो, असं सांगितलं. पोस्ट केलेल्या माहितीनुसार, महिलेने तिच्या मैत्रिणींना तिची जखम दाखवली आणि म्हणाली, "ही फक्त एक किरकोळ दुखापत आहे, याबद्दल इतकी काळजी करण्याची गरज नाही?" काही काळानंतर, तिने टिटॅनसचे इंजेक्शन घेतलं असल्याचं नंतरच्या माहितीतून दिसून आलं. मासिक पाळीच्या वेळी समुद्रात जाणं किती धोकादायक असू शकतं, याचं हे एक उदाहरण आहे.
ADVERTISEMENT











