मुंबई: दहशतवादी प्रकरणात अडकवण्याची धमकी, बनावट क्राइम ब्रांच अधिकारी अन्... तब्बल 9.30 लाख रुपये उकळले

मुंबई तक

मुंबईतील अंधेरी येथून पीडित व्यक्तीला दहशतवादी प्रकरणात अडवण्याची धमकी देऊन त्याच्याकडून तब्बल 9.30 लाख रुपये उकळल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

दहशतवादी प्रकरणात अडकवण्याची धमकी
दहशतवादी प्रकरणात अडकवण्याची धमकी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दहशतवादी प्रकरणात अडकवण्याची धमकी

point

बनावट क्राइम ब्रांच अधिकारी अन्...

point

मुंबईतील तरुणाकडून तब्बल 9.30 लाख रुपये उकळले

Mumbai Crime: मुंबईतील अंधेरी येथून सायबर फसवणूकीचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीला दहशतवादी प्रकरणात अडवण्याची धमकी देऊन त्याच्याकडून तब्बल 9.30 लाख रुपये उकळल्याची बातमी समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सायबर भामट्यांनी क्राइम ब्रांच अधिकारी असल्याची खोटी ओळख सांगून व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून पीडित तरुणाची फसवणूक केली. आरोपीने पीडित व्यक्तीला फोन करून सांगितलं की, त्याला संबंधित तरुणाच्या नावाने एक संशयास्पद पार्सल मिळालं असून त्यामध्ये दहशवादाशी संबंधित साहित्य आढळून आलं. 

दहशतवादी प्रकरणात अडकवण्याची धमकी 

अंधेरी येथील रहिवासी असलेली 42 वर्षीय पीडित व्यक्ती एका खाजगी कंपनीत कार्यरत आहे. त्याने पोलिसांकडे तक्रार करत सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून त्याला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांचं आयडी कार्ड दाखवून क्राइम ब्रांच अधिकारी असल्याचं सांगितलं. तो म्हणाला की, तुमच्यावर UAPA आणि PMLA अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. तुमच्या पार्सलमध्ये विस्फोटक साहित्य सापडलं आहे. त्यामुळे, जर तुम्ही आता तपासात सहकार्य केलं नाही तर तुम्हाला लगेच अटक केली जाईल. पीडित व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी त्याला डिजिटल अरेस्ट करण्याची धमकी दिली आणि बरेच तास व्हिडीओ कॉलद्वारे घरात लक्ष ठेवलं. दरम्यान, बनावट 'तपास क्लिअरन्स फी'च्या नावाखाली तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमधून त्यांच्याकडून 9.30 लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले. 

हे ही वाचा: मुंबई: प्रियकराच्या नादी लागून स्वतःच्या घरात चोरी करण्याचा रचला कट! तब्बल 18 लाखांहून अधिक रुपयांची चोरी अन्...

मुंबई पोलिसांचं आवाहन 

मुंबई पोलिसांचे सायबर तपास अधिकारी विवेक तांबे यांनी स्पष्ट केलं की "जर तुम्ही कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी नसाल तर तपास संस्था तुमची चौकशी का करतील? दहशतवादी प्रकरणांमध्ये तुम्हाला अडकवण्याची धमकी देणे ही फसवणुकीची एक नवीन पद्धत बनली आहे. भीती हे सायबर गुन्हेगारांचे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे, ते टाळण्याचा सर्वात मजबूत आणि खात्रीशीर मार्ग म्हणजे दक्षता आणि जागरूकता."

हे ही वाचा: संध्याकाळी बळजबरीने खोलीत नेलं अन् शारीरिक संबंध... महिलेने दिराच्या घाणेरड्या कृत्याबद्दल सगळंच सांगितलं

कोणती खबरदारी बाळगावी? 

1. कोणत्याही अनोळखी नंबरवरून फोन आल्यानंतर तो लगेच रीसिव्ह करण्याऐवजी तो सावधगिरीने हाताळा.

हे वाचलं का?

    follow whatsapp