मुंबई: प्रियकराच्या नादी लागून स्वतःच्या घरात चोरी करण्याचा रचला कट! तब्बल 18 लाखांहून अधिक रुपयांची चोरी अन्...
मुंबईच्या सांताक्रूझ परिसरात एका तरुणीने तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्याच घरात तब्बल 18 लाखांपेक्षा अधिक रक्कम चोरली असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रियकराच्या नादी लागून स्वतःच्या घरात चोरी करण्याचा रचला कट!
तब्बल 18 लाखांहून अधिक रुपयांची चोरी अन्...
मुंबईतील धक्कादायक घटना
Mumbai News: मुंबईच्या सांताक्रूझ परिसरात एका तरुणीने तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्याच घरात तब्बल 18 लाखांपेक्षा अधिक रक्कम चोरली असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या प्रकरणी या किराणा व्यापाराच्या मुलीला तिच्या प्रियकरासह अटक करण्यात आली आहे. व्यावसायिकाच्या मुलीने आपल्याच प्रियकरासोबत मिळून तिच्या घरातच चोरी केल्याचं सांगितलं जात आहे. घरातील सोन्याच्या दागिन्यांसह दोघांनी मिळून तब्बल 18 लाख 60 हजार रुपयांची चोरी केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलिसांनी आरोपी निकिता धनजी हाथियानी आणि तिचा प्रियकर रविंद्र नारायण निरकर यांना अटक केली त्यांना वांद्रे कोर्टात सादर करण्यात आलं. तिथून त्यांना 10 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
स्वतःच्या घरात चोरी करण्याचा रचला कट
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी निकिताचे वडील धनजी हाथियानी हे मूळचे गुजरातमधील कच्छचे रहिवासी आहेत आणि त्यांचा गणेश ट्रेडर्स नावाने येथे मोठा किराणा व्यवसाय आहे. हाथियानी कुटुंब गेल्या 10 वर्षांपासून सांताक्रूझमध्ये राहत आहे. धनजी त्यांची पत्नी तेजी, मुलगी निकिता आणि मुलगा केतन यांच्यासोबत राहतात राहतात. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, धनजी यांची मुलगी निकिता आणि रवींद्र निरकर हे बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करायचे होते, परंतु त्यांना त्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे, निकिताने रवींद्रसोबत मिळून स्वतःच्या घरात चोरी करण्याचा कट रचला. मुलीच्या प्रेमसंबंधाबद्दल काहीच माहिती नसल्याचं पीडित कुटुंबियांनी सांगितलं.
तक्रारदार निकिताच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांच्या घरात एकूण 12 लाख रुपये रक्कम होती आणि त्यांच्या बेडरूममधील एका लोखंडी पेटीत 13 तोळे सोन्याचे दागिनेही ठेवले होते. 18 ऑक्टोबर रोजी निकिताच्या आईने त्यांना सांगितलं की, ती निकितासोबत बाजारात गेली होती आणि घरी परतल्यावर त्यांना घरातील 12 लाख रुपये रोख आणि 6 लाखांहून अधिक किंमतीचे दागिने गायब असल्याचं आढळलं.










