Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका तरुण दंतचिकित्सकाने राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. कौटुंबिक तणाव आणि मानसिक नैराश्याला कंटाळून त्याने टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासातून समोर येत आहे.
ADVERTISEMENT
अवधूत मुळे असे या दंतचिकित्सकाचे नाव असून, तो जयसिंगपूर येथील रहिवासी होता. शिक्षणाने दंतवैद्य असलेल्या अवधूतने समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे त्याच्या जवळच्या व्यक्तींनी सांगितले आहे. घटनेच्या दिवशी अवधूतने नियोजनबद्ध पद्धतीने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे तपासातून स्पष्ट होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अवधूतने आपल्या पाठीवरील बॅगेत दगड आणि विटा भरल्या होत्या, जेणेकरून तलावात उडी घेतल्यानंतर बाहेर येण्याची शक्यता उरणार नाही. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या काही मित्रांना आणि ओळखीच्या व्यक्तींना मोबाईलवरून शेवटचे संदेश पाठवले होते. या संदेशांतून त्याची मानसिक अवस्था आणि कौटुंबिक कारणांमुळे आलेली निराशा स्पष्टपणे जाणवत असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : पीरियड्स सुरू असताना समुद्रात जाणं पडलं महागात! अचानक 'तो' मासा झाला तिच्याकडे आकर्षित झाला अन्...
यानंतर अवधूतने दुचाकीने थेट जयसिंगपूरमधील राजाराम तलाव गाठला. तलावाच्या काठावर दुचाकी उभी करून त्याने एक चिठ्ठी लिहिली. या सुसाईड नोटमध्येही कौटुंबिक तणावाचा उल्लेख असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळत आहे. चिठ्ठी लिहून झाल्यानंतर त्याने कोणालाही संशय येऊ न देता थेट तलावात उडी घेतली.
काही वेळानंतर ही घटना लक्षात येताच स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची खबर मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाच्या मदतीने तलावातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.
या घटनेनंतर मुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईक आणि मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. एक होतकरू आणि शिक्षित तरुण अशा प्रकारे आयुष्य संपवतो, यामुळे संपूर्ण जयसिंगपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आत्महत्येमागची नेमकी कारणे काय होती, याचा सखोल तपास पोलीस करत असून, सुसाईड नोट आणि मोबाईलमधील संदेशांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











