Govt Job: भारतीय सैन्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी! इंडियन आर्मीच्या नव्या प्रोग्रामसाठी लवकरच करा अप्लाय...

भारतीय सैन्य दल पात्र तरुणांना 'इंडियन आर्मी इंटर्नशिप प्रोग्राम' (IAIP) द्वारे रक्षा प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी प्रदान करते.

भारतीय सैन्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी!

भारतीय सैन्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी!

मुंबई तक

• 02:57 PM • 13 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय सैन्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी!

point

इंडियन आर्मीच्या नव्या प्रोग्रामसाठी लवकरच करा अप्लाय...

Govt Job: भारतीय सैन्य दलात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. दरवर्षी, भारतीय सैन्य दल पात्र तरुणांना 'इंडियन आर्मी इंटर्नशिप प्रोग्राम' (IAIP) द्वारे रक्षा प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी प्रदान करते. यावर्षी सुद्धा इंडियन आर्मीच्या या प्रोग्रामसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना सैन्याच्या लाइव्ह प्रोजेक्ट्सवर काम करण्याची इच्छा आहे, ते या भरतीसाठी अप्लाय करू शकतात. 21 डिसेंबर 2025 ही भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

प्रोग्राममधून काय शिकता येईल?   

या इंटर्नशिपमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना इंडियन आर्मीच्या हाय-टेक मिशन्समध्ये सहभागी केलं जाईल. यासोबतच, कटिंग एड्ज, सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन, एआय मॉडल्स आणि मिलिट्री ग्रेड सिक्योर अॅप्लिकेशनच्या डेव्हलपमेंटवर सुद्धा काम करण्याची संधी मिळेल. यासाठी उमेदवार थेट सैन्यातील वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांसोबत मिळून या प्रोजेक्ट्सवर काम करू शकतात. या माध्यमातून उमेदवारांना फ्रेंटेड, बॅकेंड, फ्रेमवर्क, एआय अँड एमएल, क्लाउड अँड नेटवर्क, जीआयएस, एपीआयएस सारख्या हाय टेक्नॉलॉजी शिकता येतील. 

काय आहे पात्रता? 

भारतीय सैन्याच्या या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी बी.ई/ बीटेक (कंप्यूटर सायन्स/डाटा सायन्स/ आयटी/ ईसीई) कोर्समध्ये शेवटच्या वर्षीचं शिक्षण घेणारे उमेदवार किंवा पदवीधर (ग्रॅज्युएट्स) अप्लाय करू शकतात. तसेच, एमटेक एआय अँड एमएल/ डेटा सायन्स/ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि एआय, एमएल, डेव्हसेकऑप्स, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि बिग डेटा किंवा संबंधित क्षेत्रात पीएचडी असलेले उमेदवार सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकतात. 

हे ही वाचा: महिलेचे विवाहबाह्य संबंध, प्रियकराकडून गर्भवती राहायचं होतं पण... अनैतिक संबंधातून भयंकर घटना!

आर्मीचा इंटर्नशिपचा हा प्रोग्रामचा कालावधी 75 दिवस असून याचं शेड्यूल सुद्धा जाहीर करण्यात आलं आहे. ही इंटर्नशिप 12 जानेवारी 2026 पासून सुरू होईल आणि 27 मार्च 2026 पर्यंत सुरू राहील. या कालावधीत, उमेदवारांना दररोज 1000 रुपये स्टायपेंड मिळेल. याचाच अर्थ 75 दिवसांसाठी, एकूण स्टायपेंड 75,000 रुपये असेल.

हे ही वाचा: ठाणे: पत्नीसोबत सतत वाद, शेवटी मित्रांना सांगून विषारी साप आणला अन्... महिलेसोबत घडलं भयानक!

कसा कराल अर्ज? 

भारतीय सैन्याने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर या इंटर्नशिप प्रोग्रामची माहिती शेअर केली आहे. यामध्ये इंटर्नशिपबद्दल सर्व आवश्यक माहिती असलेला QR कोड देखील आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर उमेदवार या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी अप्लाय करू शकतात. 21 डिसेंबर पर्यंत या भरतीसाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू राहील. 

    follow whatsapp