CBSE Result 2025 : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून (CBSE) 10 आणि 12 वीच्या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात येणार आहे. वर्ष 2025 च्या बोर्ड परीक्षेत बसलेल्या 42 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. रिपोर्ट्सनुसार, सीबीएसई कधीही दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करू शकते. अशातच विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची नजर अधिकृत वेबसाईटवर लागून राहिली आहे.
ADVERTISEMENT
निकाल कुठे आणि कसा पाहाल?
सीबीएसई बोर्डाकडून निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी cbse.gov.in आणि cbseresults.nic.in वर ऑनलाईन चेक करू शकता. विद्यार्थ्यांचा रोल नंबर, स्कूल नंबर आणि डेट ऑफ बर्थच्या मदतीने लॉग इन करू शकता. त्यानंतर डिजिटल मार्कशीटही डाऊनलोड करू शकता.
हे ही वाचा >> भारत-पाकिस्तान तणावाचा परिणाम ... 8 कंपन्यांचं 1.6 लाख कोटींचं नुकसान, रिलायन्सलाही फटका
मागील वर्षी कधी जाहीर झाला होता निकाल?
2024 मध्ये सीबीएसईने दहावीचा निकाल 12 मे आणि बारावीचा निकाल 13 मे रोजी जाहीर केला होता. यावेळी निकाल मे च्या दुसऱ्या आठवड्यात घोषित केला जाऊ शकतो. यंदा जवळपास 24.12 लाख विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. तर जवळपास 17.88 लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. अशाप्रकारे एकूण 42 लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेत सामील झाले होते.
जर एखादा विद्यार्थी एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण झाला, तर टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. सीबीएसई त्यांना कम्पार्टमेंट परीक्षेची संधी देईल. ज्यामुळे विद्यार्थी त्याच शैक्षणिक वर्षात पुन्हा परीक्षा देऊन पास होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी Digilocker अकाऊंट सुरु करावं. बोर्डाकडून डिजिटल मार्कशीट, पास सर्टिफिकेट आणि इतर कागदपत्र सर्वात आधी इथेच उपलब्ध केले जातील. यासाठी डिजीलॉकरचा वापर करणं अनिवार्य आहे.
हे ही वाचा >> मोठी बातमी! आयपीएल लवकरच सुरू होणार, 'या' 4 ठिकाणी खेळवणार सामने, फायनल कुठे रंगणार?
ADVERTISEMENT
