अमृता फडणवीस यांचे महाशिवरात्रिनिमित्त 'शंभू रे' भक्तीपर गीत भेटीला, नेटकऱ्यांकडून कमेंटचा पाऊस

मुंबई तक

13 Feb 2026 (अपडेटेड: 13 Feb 2026, 06:14 PM)

Amruta Fadanvis New Song : गायिका आणि सामाजिक व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या अमृता फडणवीस यांचे शिवरात्रिनिमित्त 'शंभू रे' हे भक्तीपर गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले. भगवान शिव यांना हे भजन अर्पण करण्यात आले असून मनाला शांती देणारं हे गीत आहे. याच गीतामध्ये अमृता फडणवीस नृत्य करताना दिसत आहेत.

Shamboo re new song

Shamboo re new song

Google CTA

बातम्या हायलाइट

point

अमृता फडवणसी यांचे शिवरात्रिनिमित्त 'शंभू रे' हे भक्तीपर गीत प्रेक्षकांच्या भेटीला

point

नेटकऱ्यांच्या कमेंटचा वर्षाव

Amruta Fadanvis New Song : गायिका आणि सामाजिक व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या अमृता फडणवीस यांचे शिवरात्रिनिमित्त 'शंभू रे' हे भक्तीपर गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले. भगवान शिव यांना हे भजन अर्पण करण्यात आले असून मनाला शांती देणारं हे गीत आहे. याच गीतामध्ये अमृता फडणवीस नृत्य करताना दिसत आहेत. हे गीत सोशल मीडियावर चर्चेत आलेलं आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा :  अहिल्यानगर : वर्गशिक्षकाकडून 4 विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचार, नराधम न्यायालयाजवळ पोहोचताच महिलांनी झोडपलं

अमृता फडणवीस यांचे 'शंभू रे' हे गीत टी-सीरीजच्या बॅनरखाली

'शंभू रे' हे गीत टी-सीरीजच्या बॅनरखाली बनले आहे. संगीत दिग्दर्शन संगीतकार मोंटी शर्मा यांनी केलं आहे. या भजनाचे लेखन श्रीवर्धन वैश्नव यांनी केलं आहे. गीतामधील भाव आणि भक्तीपूर्ण संगीत मंत्रमुग्ध करून टाकणारे आहे, ज्यामुळे हे गाणं काही वेगळ्या आध्यात्मिक प्रेक्षकांना प्रेरित करतं. 

नेटकऱ्यांकडून कमेंटचा वर्षाव

या गाण्यावर प्रेक्षकांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं की, जबरदस्त डायरेक्शन. दुसऱ्याने लिहिलं की, आसामी पारंपारिक वेषभूषेतील गाणं शूट केल्याबद्दल धन्यवाद. तसेच तिसऱ्याने लिहिलं की, अमृता मॅडम तुमच्या सर्व गाण्यांपैकी हे गाणं मला सर्वाधिक आवडलं आहे. 

हे ही वाचा :  प्रफुल्ल पटेलांची फाईल क्लिअर करण्यासाठी थांबले अन् अजितदादांना उशीर झाला, ते विमानाने गेले; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर चर्चेत आलेलं आहे. याआधी देखील अमृता फडणवीस यांनी काही गाणी गायली आहेत, ज्यात 'मुंबई रिव्हम अँथम', 'अलग मेरा ये रंग है' आणि 'तु मंदिर तु शिवाला' यांसारखी गीतं देखील चर्चेत आली होती.