केरळची सर्वात लहान organ donor; 10 महिन्यांची चिमुकली 5 जणांचा जीव वाचवणार!

Kerala's youngest organ donor : पथानामथिट्टा जिल्ह्यातील मल्लप्पल्ली येथील Alin Sherin Abraham ही 10 महिन्यांची चिमुकली 5 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास अपघातात गंभीर जखमी झाली. ती आपल्या आई आणि आजी-आजोबांसह कोट्टायमहून तिरुवल्लाकडे एम.सी. रोडने प्रवास करत होती. यावेळी समोरून आलेल्या कारने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात अ‍ॅलिनला गंभीर दुखापत झाली, तर तिची आई आणि आजी-आजोबा देखील जखमी झाले होते.

Kerala's youngest organ donor

Kerala's youngest organ donor

मुंबई तक

14 Feb 2026 (अपडेटेड: 14 Feb 2026, 09:03 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

केरळची सर्वात लहान organ donor

point

10 महिन्यांची चिमुकली 5 जणांचा जीव वाचवणार!

Kerala's youngest organ donor : केरळमध्ये हृदय पिळवटून टाकणाऱ्या दु:खद घटनेतून आशेचा किरण उजळलेला पाहायला मिळालाय. केरळमधील सर्वात लहान organ donor म्हणजेच 10 महिन्यांच्या Alin Sherin Abraham या चिमुकलीमुळे 5 जणांना जीवनदान मिळण्याची शक्यता आहे. तिच्या मृत्यूनंतर तिचे अवयव दान करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आणि त्या निर्णयामुळे अनेक कुटुंबीयांना त्याच्या जवळचा व्यक्ती वाचवता येणार आहे.

हे वाचलं का?

10 महिन्यांच्या Alin चा अपघाती मृत्यू अन् कुटुंबीयांचा अवयव दान करण्याचा निर्णय 

पथानामथिट्टा जिल्ह्यातील मल्लप्पल्ली येथील Alin Sherin Abraham ही 10 महिन्यांची चिमुकली 5 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास अपघातात गंभीर जखमी झाली. ती आपल्या आई आणि आजी-आजोबांसह कोट्टायमहून तिरुवल्लाकडे एम.सी. रोडने प्रवास करत होती. यावेळी समोरून आलेल्या कारने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात अ‍ॅलिनला गंभीर दुखापत झाली, तर तिची आई आणि आजी-आजोबा देखील जखमी झाले होते.

प्रथम तिला चंगनाश्शेरी आणि तिरुवल्ला येथील रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी तिला कोची येथील Amrita Hospital येथे हलवण्यात आले. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही 13 फेब्रुवारी रोजी तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. या अत्यंत कठीण प्रसंगी तिचे वडील अरुण अब्राहम आणि आई शेरिन अ‍ॅन जॉन यांनी तिचे अवयव दान करण्यास संमती दिली.

हेही वाचा : आधी लिंग बदलाची शस्त्रक्रिया अन् आता अनाया बांगरचा आणखी मोठा निर्णय, पुन्हा सर्जरी करणार, VIDEO शेअर करत म्हणाली...

कोणते अवयव कुठे दान करण्यात येणार? 

अ‍ॅलिनचे यकृत तिरुवनंतपुरम येथील KIMS Hospital येथे उपचार घेत असलेल्या सहा महिन्यांच्या बाळाला प्रत्यारोपित करण्यात येणार आहे. राज्यात मृत्युपश्चात अवयवदानातून यकृत मिळवणारे हे सर्वात लहान बाळ ठरणार आहे. तिची दोन्ही मूत्रपिंडे तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेजच्या एसएटी रुग्णालयातील एका बालकाला दिली जाणार आहेत. तिची heart valve ही Sree Chitra Institute येथे प्रत्यारोपित केली जाईल, तर दोन्ही eyeballs अमृता रुग्णालयातच ठेवण्यात आले आहेत.

अवयव नेण्यासाठी विशेष समन्वय साधण्यात आला. कोचीहून तिरुवनंतपुरमपर्यंत अॅम्ब्युलन्सने केवळ तीन तास पंधरा मिनिटांत अंतर पूर्ण केले, जे साधारणतः सहा तासांचे असते. पोलिसांनी आणि नागरिकांनी रस्ते मोकळे करून या कार्यात सहकार्य केले. ही संपूर्ण प्रक्रिया Kerala State Organ and Tissue Transplant Organization (के-सोट्टो) यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्याच्या गृह विभागाच्या सहकार्याने पार पडली. आज रात्री दोन प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार आहेत.

राज्याच्या आरोग्यमंत्री Veena George यांनी या निर्णयाबद्दल पालकांचे आभार मानले. अत्यंत दु:खाच्या क्षणी घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना जीवनदान मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अॅम्ब्युलन्स चालक, आरोग्य कर्मचारी, पोलिस आणि सहकार्य करणाऱ्या नागरिकांचेही त्यांनी आभार व्यक्त केले. अ‍ॅलिनच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीची जाणीव कायम राहील; मात्र तिच्या अवयवदानामुळे अनेकांच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

T20 World Cup मध्ये सर्वात मोठा उलटफेर, झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला, 19 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती
 

    follow whatsapp