Govt Job: इंडियन आर्मीमध्ये देशसेवेची सुवर्णसंधी! 10 पास उमेदवारांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू...

मुंबई तक

• 02:37 PM • 13 Feb 2026

उमेदवारांसाठी भारतीय सैन्यात नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. इंडियन आर्मीकडून अग्निवीर भरती 2026 साठी नोटिफिकेशन जाहीर झालं असून उमेदवार joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.

इंडियन आर्मीमध्ये देशसेवेची सुवर्णसंधी!

इंडियन आर्मीमध्ये देशसेवेची सुवर्णसंधी!

Google CTA

बातम्या हायलाइट

point

इंडियन आर्मीमध्ये देशसेवेची सुवर्णसंधी!

point

10 पास उमेदवारांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू...

Indian Army Agniveer Recruitment 2026: भारतीय सैन्यात सहभागी होण्याचं लाखो उमेदवारांचं स्वप्न असतं. या इच्छुक उमेदवारांसाठी भारतीय सैन्यात नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. इंडियन आर्मीकडून अग्निवीर भरती 2026 साठी नोटिफिकेशन जाहीर झालं असून उमेदवार  joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 

हे वाचलं का?

आनंदाची बाब म्हणजे, ज्या उमेदवारांना त्यांचं वय जास्त असल्याची चिंता आहे, ते सुद्धा अर्ज करू शकतील. आता 22 वर्षांपर्यंतच्या उमेदवारांना अग्निवीर भरतीसाठी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. 13 फेब्रुवारी म्हणजे आज या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 1 एप्रिल पर्यंत अर्ज करू शकतात. 

काय आहे पात्रता? 

1. अग्निवीर (जनरल ड्यूटी): या पदासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 45 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण/ मॅट्रिक पास असणं आवश्यक आहे. तसेच, पाच बेसिक विषयांत किमान 33 टक्के गुण असणं गरजेचं आहे. 

2. अग्निवीर टेक्निकल: विज्ञान/ भौतिकशास्त्र/ गणित आणि इंग्रजी या विषयांसह 10+2 इंटरमीडिएट परीक्षा किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

3. अग्निवीर (लिपिक/स्टोअरकीपर/टेक्निकल): या पदासाठी कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेत 10+2/ इंटरमीडिएट परीक्षा किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 12 वीत इंग्रजी आणि गणित/ लेखा/ बुककीपिंगमध्ये 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. 

4. अग्निवीर ट्रेड्समन: पाचही मूलभूत विषयांमध्ये 33 टक्के गुणांसह 10 वी/ 8 वी उत्तीर्ण. 

5. अग्निवीर जनरल ड्यूटी (महिला लष्करी पोलिस): किमान 45 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण असून त्यापैकी प्रत्येक विषयात 33 टक्के गुण मिळवणे गरजेचे आहे. 

6. सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंट: विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषयांमध्ये 50 टक्के गुणांसह आणि प्रत्येक विषयात 40 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. 

7. शिपाई फार्मा: संबंधित पदासाठी 10+2 परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. डी. फार्मामध्ये उमेदवाराने किमान 55 टक्के गुण मिळवलेले असावेत आणि फार्मसी काउन्सिलमध्ये नोंदणीकृत असणं आवश्यक आहे. किंवा बी. फार्मामध्ये किमान 50 टक्के गुण असलेले आणि राज्य फार्मसी कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

पदानुसार, पात्रतेसंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार अधिकृत नोटिफिकेशन तपासू शकतात. 

हे ही वाचा: 11 वीच्या विद्यार्थीनीवर 4 वेगवेगळ्या कारमध्ये नेऊन अत्याचार, व्हिडीओ बनवून 40 हजार कमावले; नराधमांना अटक

वयोमर्यादा 

  • पदानुसार, उमेदवारांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 
  • अग्निवीर GD/टेक्निकल/ असिस्टंट/ ट्रेड्समन : 17.5 से 22 वर्षे वयोमर्यादा 
  • सोल्जर टेक्निकल: 17.5 से 23 वर्षे वयोमर्यादा 
  • शिपाई फार्मा: 19 ते 25 वर्षे वयोमर्यादा 
  • JCO धार्मिक टीचर: 25 ते 24 वर्षे वयोमर्यादा 

भरतीसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार इंडियन आर्मीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.