Maharashtra SSC Board Result 2025: मोठी बातमी, महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, 'या' दिवशी पाहता येईल निकाल

Maharashtra SSC Board Results 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठी अपडेट समोर आली आहे. बोर्डाने दहावीच्या निकालाची तारीख आता जाहीर केली आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

12 May 2025 (अपडेटेड: 12 May 2025, 01:58 PM)

follow google news

SSC Board Result 2025: पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाबाबबत एक मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. दहावीच्या परीक्षेचा हा उद्या (13 मे 2025) रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल हा जाहीर केला जाईल. (ssc result 2025 maharashtra board 10th result date declared how to check know it)

हे वाचलं का?

विद्यार्थी https://mahahsscboard.in/mr या लिंकद्वारे महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल थेट पाहू शकतात. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एसएससी म्हणजे दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली होती. 

दहावीचा निकाल 'या' वेबसाइट्सवर पाहता येईल

  1. https://results.digilocker.gov.in
  2. https://sscresult.mahahsscboard.in  
  3. http://sscresult.mkcl.org
  4. https://results.targetpublications.org
  5. https://results.navneet.com
  6. https://www.indiatoday.in/education-today/results
  7. https://www.aajtak.in/education/board-exam-results

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. 10 वी ) फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.

हे ही वाचा>> दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल आज होणार जाहीर? वेळ काय असेल, जाणून घ्या एका क्लिकवर

तसेच https://mahahsscboard.in ( in school login ) या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

SSC Result 2025: दहावीचा निकाल कसा पाहता येणार?

  • सगळ्यात आधी MSBSHSEच्या Mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

  • होम पेजवर असलेल्या महाराष्ट्र दहावीचा निकाल 2025 या लिंकवर क्लिक करा.

  • लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रिझल्ट पेज सुरु होईल.

  • यावेळी विद्यार्थ्यांना त्यांचा जो सीट नंबर किंवा नोंदणी क्रमांक (जो हॉल तिकीटवर) असतो  तो रिझल्ट पेजमध्ये टाकावा.

हे ही वाचा>> CBSE Result 2025 : सीबीएसई बोर्डाचा निकाल कधी लागणार? 'या' लिंकवर पाहा रिझल्ट, 42 लाख विद्यार्थी..

  • त्यानंतर खालच्या टॅबमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावाचे पहिले तीन अक्षर टाकावे लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना सब्मिट हे बटण दाबावं लागणार आहे.

  • समजा, तुमचा सीट नंबर M154679 असेल आणि तुमच्या आईचे नाव राधिका असं असेल तर तुम्ही M154679 हा तुमचा सीट नंबर टाकून पुढच्या बॉक्समध्ये आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच RAD असं टाकावं लागेल.

  • त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा.

  • सबमिट बटणारवर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा निकाल तात्काळ स्क्रीनवर पाहायला मिळेल.

    follow whatsapp