Ahilyanagar Crime News , श्रीरामपूर : शहरात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका शाळेतील वर्गशिक्षकाने चार विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळलीये. नराधमाला न्यायालयात नेताना महिलांनी त्याच्या कानशिलात लगावलीये.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, एका विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. त्यानंतर संबंधित शिक्षकाने आणखी तीन ते चार विद्यार्थिनींसोबत गैरकृत्य केल्याचे समोर आले. या तक्रारीनंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात लैंगिक अत्याचार तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन गोणारकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपी शिक्षकाचे नाव असून, पोलिसांनी त्याला तात्काळ गजाआड केले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, संबंधित शिक्षकाने यापूर्वीही असे प्रकार केले आहेत का, याची महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येत आहे.
हेही वाचा : ज्योतिषाकडून ब्रेन वॉश, मुलीने स्वत:च्या आईला झोपेत असतानाच संपवलं, नैसर्गिक मृत्यूचा बनाव रचला
या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, मुलींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रातच अशा प्रकारची घटना घडल्याने समाजमन हादरले आहे.
विद्यार्थीनींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत यापूर्वीही पालकांनी वारंवार तक्रारी केल्याची माहिती समोर आली आहे. एवढी मोठी संस्था असूनही शाळेत वॉचमन नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी थेट रस्त्यावर पळत सुटतात. शेजारील जिजामाता चौकात मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने लहान-मोठे अपघात घडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
याबाबत पालकांनी शालेय प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे श्रीरामपूरसह राज्यभरात संताप व्यक्त केला जात असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्रातलं असं एक गाव जिथं आंतरजातीय विवाह थाटात लावले जाणार! 'जातमुक्ती'साठी ऐतिहासिक निर्णय
ADVERTISEMENT











