गोंदिया : मॅडम 'तो' तुम्हाला 'लॉलीपॉप' म्हणाला, विद्यार्थीनीने सांगताच गैरसमज झाला; शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Gondia Crime News : अधिकची माहिती अशी की, धैर्य मनोज मिश्रा (वय 9) हा दुपारच्या सुट्टीदरम्यान वॉशरूमकडे जात असताना त्याच्या मित्राकडे असलेल्या लॉलीपॉपबाबत बोलत होता. गोंदियातील ग्रामीण भागात लॉलीपॉपला ‘चूपरी’ असे संबोधले जाते. धैर्यने आपल्या मित्राला “माझी चूपरी मला दे” असे म्हटल्याचे सांगितले जाते. मात्र हे शब्द जवळ उभ्या असलेल्या एका विद्यार्थिनीने ऐकले आणि तिला धैर्यने शिक्षिका शोभा गिरडकर यांना ‘चूपरी’ म्हटल्याचा गैरसमज झाला.

Gondia Crime News

Gondia Crime News

मुंबई तक

12 Feb 2026 (अपडेटेड: 12 Feb 2026, 01:18 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

गोंदिया : मॅडम 'तो' तुम्हाला 'लॉलीपॉप' म्हणाला

point

विद्यार्थीनीने सांगताच गैरसमज झाला

point

शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Gondia Crime News : गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील गोरठा येथील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एका गैरसमजातून शिक्षकेने 9 वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे गावात संतापाची लाट उसळली असून विद्यार्थ्याच्या आईने आमगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : 23 वर्षीय तरुणाचे 7 वर्षीय चिमुरड्यावर अत्याचार, मशिदीच्या छतावर नेत नको तेच... सीसीटीव्हीतून सत्य आलं समोर

गैरसमज झाल्याने घडला प्रकार 

अधिकची माहिती अशी की, धैर्य मनोज मिश्रा (वय 9) हा दुपारच्या सुट्टीदरम्यान वॉशरूमकडे जात असताना त्याच्या मित्राकडे असलेल्या लॉलीपॉपबाबत बोलत होता. गोंदियातील ग्रामीण भागात लॉलीपॉपला ‘चूपरी’ असे संबोधले जाते. धैर्यने आपल्या मित्राला “माझी चूपरी मला दे” असे म्हटल्याचे सांगितले जाते. मात्र हे शब्द जवळ उभ्या असलेल्या एका विद्यार्थिनीने ऐकले आणि तिला धैर्यने शिक्षिका शोभा गिरडकर यांना ‘चूपरी’ म्हटल्याचा गैरसमज झाला. त्या विद्यार्थिनीने ही बाब संबंधित शिक्षिकेला सांगितल्यानंतर शिक्षिकेने धैर्यला बोलावून घेतले आणि त्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीमुळे धैर्य घाबरून गेला असून शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. शाळेतून घरी आल्यानंतर धैर्यने झालेल्या प्रकाराची माहिती आपल्या पालकांना दिली.

पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल 

सायंकाळी धैर्यची आई राणी मिश्रा घरी आल्यानंतर मोठ्या मुलांनी धैर्यला झालेल्या मारहाणीबाबत सांगितले. आपल्या मुलाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आल्याचा आरोप करत त्या संतप्त झाल्या. दुसऱ्याच दिवशी त्यांनी आमगाव पोलीस स्टेशन गाठून संबंधित शिक्षिकेविरुद्ध तक्रार दाखल केली. या घटनेनंतर धैर्यचे मनोबल खचले असून तो शाळेत जाण्यास घाबरत असल्याचे आईने सांगितले. “माझ्या मुलाने काही चुकीचे बोलले नव्हते. गैरसमजातून त्याला मारहाण करण्यात आली,” असा आरोप त्यांनी केला आहे. राईट टू एज्युकेशन कायद्यानुसार विद्यार्थ्यांवर शारीरिक शिक्षा करण्यास बंदी आहे. त्यामुळे पोलीस तक्रारीनंतर शिक्षण विभागाकडून संबंधित शिक्षिकेवर कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मोठ्या हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल वेश्याव्यवसाय... पोलिसांनी छापा टाकताच तब्बल 11 महिलांना घेतलं ताब्यात
 

    follow whatsapp