नाना पाटेकरांची शेवटची 2 तास 50 मिनिटं... मृत्यूपूर्वी काय घडलं?

मुंबई तक

08 Oct 2026 (अपडेटेड: 08 Oct 2026, 08:50 PM)

नाना पाटेकर यांच्या निधनापूर्वीच्या शेवटच्या दोन तासांहून अधिक काळात नेमकं काय घडलं, रात्री 2.30 वाजता छातीत दुखू लागल्यापासून ते पहाटे 5.20 वाजता डॉक्टरांनी मृत घोषित करेपर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम समोर आला आहे.

nana patekar last two hours cardiac arrest doctor reveals final moments

नाना पाटेकर

Google CTA

पणजी: 8 ऑक्टोबर 2026 रोजी गुरुवारी पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. गोव्यात वयाच्या 75 व्या वर्षी त्यांचं कार्डियाक अरेस्टनं म्हणजे ह्रदयाची धडधड थांबल्याने त्यांचं निधन झालं. अत्यंत ठणठणीत प्रकृती असलेल्या नानांच्या या अचानक झालेल्या एक्झिटने सगळ्यांना हादरवून सोडलंय. नानांच्या मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या 2 तास 50 मिनिटांत काय-काय घडलं, डॉक्टरांचं म्हणणं काय, हे आपण जाणून घेणार आहोत,

हे वाचलं का?

नेमकं काय घडलं?

नाना पाटेकर हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या गोव्यातल्या दोना पावला इथल्या घरी मुक्कामी होते. इथं ते आपल्या मदतनीसासह राहायचे. 7 ऑक्टोबरच्या रात्रीही ते नेहमीप्रमाणे आपली दिनचर्या आटोपून झोपायला गेले. पण अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. यानंतरचा सारा घटनाक्रम मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी इंडिया टुडेशी बोलताना सविस्तरपणे नमूद केला.

हे ही वाचा>> कोण होतं नाना पाटेकरांचं पहिलं प्रेम? ‘ते’ उत्तर ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल टचकन पाणी!

त्यांच्या माहितीनुसार, मध्यरात्री 2.30 वाजता नानांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यांच्या छातीत डाव्या बाजूला तीव्र वेदना होत होत्या. तसं त्यांनी तातडीने म्हणजेच अडीच वाजताच गोव्यातल्या आपल्या एका मित्राला मेसेज करून मदतीसाठी बोलावलं. मात्र, रात्र असल्याने त्या मित्राने तो मेसेज लगेच पाहिला नाही. पहाटे 4 वाजता मित्राने मेसेज वाचला आणि तो तातडीने नानांच्या घरी पोचला, तेव्हा नाना फरशीवर पडलेले होते. त्यांना प्रचंड घाम फुटला होता आणि श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. ते पूर्णपणे बेशुद्धावस्थेत जात होते.

हे ही वाचा>> कायम साधेपणाने जगलेले नाना पाटेकर किती कोटींचे मालक? मागे सोडली ‘एवढ्या’ कोटींची संपत्ती!

यापुढची माहिती देताना डॉ. साळकर सांगतात, पहाटे 4.18 च्या दरम्यान नानांचा केअरटेकर रुग्णालयातून रुग्णवाहिका घेण्यासाठी धावत आला. लागलीच आमची वैद्यकीय टीम 4.20 पर्यंत त्यांच्या घरी पोचली. नाना कोणताही प्रतिसाद देत नव्हते, त्यामुळे आमच्या पथकाने त्यांना तिथेच 45 मिनिटे सीपीआर दिला. त्यांना रुग्णालयात आणलं तेव्हा ते 'ब्रॉट डेड' होते. म्हणजेच रूग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. तरीही आम्ही त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. शर्थीचे प्रयत्न केले. सलग तासभर सीपीआर दिल्यानंतर अखेर 5.20 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

नानांनी अंतिम श्वास घेतला तेव्हा, त्यांचा मित्र आणि मदतनीस हेच सोबत होते. मुलगा मल्हार हा पुण्यात होता. कार्डियॅक अरेस्टने नानांचा मृत्यू झाला. म्हणजे, हृदयची स्पंदनं, उघडझाप होणं अचानक थांबतं, त्यामुळे शरीरातल्या महत्त्वाच्या अवयवांना आणि मेंदूला रक्तपुरवठा बंद होतो. पण, कार्डियॅक अरेस्ट का आला, मृत्यूचं नेमकं कारण काय, हे जाणून घेण्यासाठी त्यांचा मृतदेह गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

या घटनेपूर्वी चार दिवस आधी म्हणजेच 4 ऑक्टोबरला नाना पाटेकर गोव्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात अतिशय उत्साहात दिसले होते. 'सम्राट क्लब इंटरनॅशनल'च्या सोहळ्यात ते पांढरा कुर्ता आणि गमछा घालून सहभागी झाले होते. तिथं त्यांनी आपले जवळचे मित्र आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. हेच त्यांचं शेवटचं भाषण ठरलं.