Govt Jobs : रेल्वेमध्ये नॉन टेक्निकल पदांसाठी मोठी भरती, कसा कराल अर्ज?

मुंबई तक

• 03:39 PM • 08 Oct 2026

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने नॉन टेक्निकल पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 6 नोव्हेंबर आहे. पदवीधरांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

RRB Recruitment

RRB Recruitment

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

रेल्वेमध्ये नॉन टेक्निकल पदांसाठी मोठी भरती

point

कसा कराल अर्ज?

RRB Recruitment : भारतीय रेल्वे मंत्रालयांतर्गत येणाऱ्या रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाद्वारे (RRB) पदवीधर उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नॉन-टेक्निकल अंतर्गत एकूण 3,548 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी किंवा समतुल्य शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत. या भरतीमुळे रेल्वे विभागात सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो पदवीधरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे वाचलं का?

कोणती पदे भरली जाणार?

या भरती प्रक्रियेत मुख्यत्वे चार प्रमुख पदांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक 2,750 जागा या 'गुड्स ट्रेन मॅनेजर' पदासाठी आहेत. याशिवाय 'सिनियर क्लार्क कम टायपिस्ट'च्या 371 जागा, 'ज्युनिअर अकाऊंट्स असिस्टंट कम टायपिस्ट'च्या 300 जागा आणि 'चीफ कमर्शियल कम तिकिट सुपरवायझर'च्या 127 जागा भरल्या जाणार आहेत. गुड्स ट्रेन मॅनेजर, सिनियर क्लार्क आणि ज्युनिअर अकाऊंट्स असिस्टंट या पदांसाठी वेतन स्तर 5 नुसार 29,200 रुपयांचे मूळ वेतन दिले जाईल, तर चीफ कमर्शियल कम तिकिट सुपरवायझर या पदासाठी वेतन स्तर 6 नुसार 35,400 रुपयांचे मूळ वेतन निश्चित करण्यात आले आहे.

हे ही वाचा : स्टार झाला, पुरस्कार जिंकले; पण नाना पाटेकरांनी कमावलं ते काही वेगळंच…

'अशी' होणार परीक्षा

उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2027 रोजी 18 ते 33 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. या भरतीसाठीची निवड प्रक्रिया विविध टप्प्यांत पार पडणार असून, यामध्ये प्रथम टप्प्याची संगणक आधारित परीक्षा (CBT 1), दुसऱ्या टप्प्याची परीक्षा (CBT 2), कागदपत्र पडताळणी (Document Verification) आणि वैद्यकीय तपासणी (Medical Examination) यांचा समावेश असेल. प्रत्येक पदासाठी ठरवून दिलेल्या वैद्यकीय मानकांनुसार उमेदवारांची शारीरिक व वैद्यकीय पात्रता तपासली जाईल.

हे ही वाचा : नानांसोबतची 'ती' इच्छा अपूर्णच.. रितेश देशमुखची भावनिक पोस्ट

अर्जाची अंतिम मुदत

या भरतीसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज प्रक्रिया 8 ऑक्टोबर पासून सुरू झाली असून, अर्जाची अंतिम मुदत 6 नोव्हेंबर आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन रेल्वे भरती बोर्डाद्वारे करण्यात आले आहे. भरतीविषयी सविस्तर माहिती, अटी व ऑनलाईन अर्जासाठी उमेदवारांनी रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळाला (rrb.indianrailways.gov.in) भेट द्यावी.