India vs Pakistan Ceasefire Update : भारताच्या ऑपरेशन सिंदूरचं ध्येय फक्त पाकिस्तानी आणि पीओकेत असलेल्या दहशतवादी अड्ड्यांना निशाणा बनवणं आहे. या ऑपरेशनमध्ये भारताला मोठं यश प्राप्त झालं आहे. तिन्ही सेनेच्या डीजी ऑपरेशनने रविवारी पत्रकार परिषदेत सैनिकांच्या कारवाईबाबत माहिती दिली. डीजीएओ राजीव घईने सांगितलं की, 9 दहशतवादी अड्ड्यांना टार्गेट करण्यात आलं. यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. यामध्ये कंधार हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यात सामील असलेला युसूफ अजहर, अब्दूल मलिक आणि मुदस्सिर अहमदसारख्या दहशतवाद्यांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
40 पाकिस्तानी सैनिकांना मारलं
मिलिट्री ऑपरेशनचे डायरेक्टर जनरल राजीव घई यांनी म्हटलंय की, भारतने सीमेवरून पाकिस्तानच्या गोळीबारील जोरदार प्रत्युत्तर दिलं. या ऑपरेशनमध्ये प्रत्युत्तर देण्याच्या कारवाईत भारतीय सेनेनं फक्त नियंत्रण रेषेवरच पाकिस्तानी आर्मीचे 30-40 सैनिक आणि अधिकाऱ्यांना मारलं. भारताकडून करण्यात आलेल्या प्रतिहल्ल्यापासून वाचण्यासाठी पाकिस्तानने नागरी विमानांना ढाल बनवलं.
हे ही वाचा >>CBSE Result 2025 : सीबीएसई बोर्डाचा निकाल कधी लागणार? 'या' लिंकवर पाहा रिझल्ट, 42 लाख विद्यार्थी..
परंतु, आम्ही कोणत्याही नागरी विमानाला टार्गेट केलं नाही. तर पाकिस्तानच्या सैन्य ठिकाणांना लक्ष्य केलं. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून बहावलपूर आणि मुरीदके येथील दहशतवाद्यांच्या महत्त्वाच्या ठिकाणांना टार्गेट करण्यात आलं. याठिकाणी खूप नुकसान झालं आहे. पाकिस्तानने आमच्या सैन्य ठिकाणांवर एअर स्ट्रिपला छोटे ड्रोन आणि UAVs च्या माध्यमातून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आमच्या एअर डिफेन्स सिस्टमने प्रत्येक हल्ला निकामी केला.
भारतीय सेनेकडून सांगण्यात आलं की, पाकिस्तान आर्मीचे सैनिक सुरुवातीला आमच्या टार्गेटवर नव्हते. आमचा टार्गेट फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना उद्ध्वस्त करण्याचं होतं. जेव्हा पाकिस्तानने सीजफायरचं उल्लंघन करून गोळीबार केला, तेव्हा आमच्याकडूनही सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आलं.
हे ही वाचा >> भारत-पाकिस्तान तणावाचा परिणाम ... 8 कंपन्यांचं 1.6 लाख कोटींचं नुकसान, रिलायन्सलाही फटका
यामध्ये पाकिस्तानी आर्मीचंही मोठं नुकसान झालं. सेनेकडून सांगण्यात आलं की, आमचं काम टार्गेट हिट करणं आहे, जे आम्ही यशस्वीपणे पार पाडलं आहे. ऑपरेशन दरम्यान पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारमध्ये भारतीय सेनेचे पाच सैनिकही शहिद झाले.
ADVERTISEMENT
