Nadia Afgan On India Pak Ceasefire : भारत आणि पाकिस्तानमध्ये अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्ती करून युद्धविराम झाल्याचं घोषित केलं होतं. याबाबत ट्रम्प यांनी ट्वीट केलं होतं. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सतत होणारे ड्रोन हल्ले आणि गोळीबार लक्षात घेता हे पाऊल उचलण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT
या युद्धविरामनंतर पाकिस्तानी अभिनेत्री नादिया अफगन यांची पहिली रिअॅक्शन समोर आली आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी म्हटलं की, काल शनिवारी दुपारी 3.35 मिनिटांनी दोन्ही देशांच्या DGMO मध्ये चर्चा झाली होती. यावेळी निर्णय घेण्यात आला होता की, दोन्ही देशांनी आकाश, जल आणि जमिनीवरचे हल्ले थांबवण्यात येतील.
पाकिस्तानी अभिनेत्रीची पहिली प्रतिक्रिया
भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट केलं आहे. त्यांच्या या ट्टीटवर रिअॅक्शन देत नादियाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत म्हटलं, हे खूप दिलासादायक आहे. दोन्ही देशात शांतता कायम राहिली पाहिजे.
हे ही वाचा >> "ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच...", हवाई दलानं पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी
भारतात पाकिस्तानी कलाकारांना काम करण्यावर बंदी घातली आहे. पाकिस्तानच्या सर्व गायक आणि कलाकारांना इन्स्टाग्रामवर ब्लॉक करण्यात आलं आहे. यामुळे भारतात पाकिस्तानी कलाकारांचे पोस्ट दिसणार नाहीयत. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी कलाकारांमध्ये नारीज असल्याचं पाहायला मिळालं होतं. माहिरा खान, फवाद खान आणि गायक जीशान अलीने पाकिस्तान जिंदाबादची घोषणा केली होती.
हे ही वाचा >> आरारारारा खतरनाक! महाराष्ट्रात सोन्याचे भाव पुन्हा कडाडले, भारत-पाक युद्धाचा काय झाला परिणाम?
पाकिस्तानी कलाकारांनी काय म्हटलं होतं?
हानिया आमिरने पोस्ट करत म्हटलं होतं की, माझ्याकडे आता कोणताही मोठा शब्द नाहीय. माझ्या मनात आता राग आणि दु:ख आहे. ही पूर्णपणे क्रूरता आहे. माहिरा खाननेही भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर टीका केली होती. 'हे निंदनीय आहे. देव आमचं रक्षण करेल.'
ADVERTISEMENT
