Extra Marital Affair: मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये एक दोन मुलांची अचानक घरातून बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची माहिती समोर आली. या प्रकरणासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आणि संबंधित महिलेचा पोलिसांनी तपास सुरू केला. आता ती महिला पोलिसांना सापडली असून ती रीवा येथील बैकंठपुरमध्ये तिच्या प्रियकरासोबत राहत असल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित महिला ही इंदौरची रहिवासी असून खरगोनमध्ये तिचं माहेर आहे.
ADVERTISEMENT
अचानक महिला तिच्या घरातून गायब झाल्यानंतर तिच्या पतीने पोलीस स्टेशनमध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. आता पोलिसांनी महिलेचा शोध घेतला असून ती वेगळाच बहाणा सांगत असल्याचं समोर आलं. चौकशीदरम्यान, महिलेनं सांगितलं की, "मी माझ्या प्रियकरासोबतच राहणार आहे. मला माझ्या नवऱ्याकडे परत जायचे नाही. आता माझ्या प्रियकरालाच मी नवरा मानलं आहे." आश्चर्याची बाब म्हणजे, हे कृत्य करण्याआधी महिलेनं स्वत:च्या दोन मुलांचा देखील विचार केला नाही. आपली मुलं आईच्या प्रेमाशिवाय कशी राहू शकतील, असा विचार देखील महिलेच्या मनात आला नाही.
हे ही वाचा: बॉयफ्रेंडसोबतच्या शारीरिक संबंधापायी महिलेने पतीचा विषयच केला The End, पण मटन सूपमुळे...
प्रियकरासाठी पती आणि मुलांना सोडलं..
28 वर्षीय विवाहित महिला तिचा पती आणि दोन मुलांसह इंदौरमध्ये राहत होती. दरम्यान, तिच्या शेजारी राहणाऱ्या आकाश साकेत नावाच्या 25 वर्षीय तरुणावर तिचं प्रेम जडलं. त्यांच्यातील प्रेमसंबंध वाढत गेल्यानंतर संबंधित महिला तिच्या माहेरी राहू लागली. तिच्या माहेराहून ती महिला कोणालाही न सांगता प्रियकर आकाशसोबत पळून गेली. महिला बेपत्ता झाल्यावर तिच्या पतीने खरगोन पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आणि त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
हे ही वाचा: तुम्हीही हादरून जाल अशी घटना... 13 वर्षाच्या मुलाकडून 6 वर्षीय मुलीवर बलात्कार
प्रियकरासोबत सापडली महिला
तपासादरम्यान, पोलिसांना ती महिला आकाश साकेत नावाच्या तरुणासोबत पळून गेल्याची माहिती मिळाली. तसेच, आकाशचं घर रेवा येथील बैकुंठपूरमध्ये असल्याचं आढळून आलं. यानंतर खरगोन पोलिसांनी रेवा पोलिसांची मदत घेतली. संबंधित महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली. पोलीस आणि कुटुंबियांनी महिलेला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण ती तिच्या प्रियकरासोबत राहण्याच्या निर्णयावर ठाम होती.
ADVERTISEMENT
