तुम्हीही हादरून जाल अशी घटना... 13 वर्षाच्या मुलाकडून 6 वर्षीय मुलीवर बलात्कार
उत्तर प्रदेशातील कोतवाली परिसरात एका 13 वर्षांच्या मुलाने 6 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
6 वर्षीय मुलीसोबत घृणास्पद कृत्य
13 वर्षीय मुलाने 6 वर्षीय मुलीवर केला बलात्कार...
Crime News: 21 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील रॉबर्ट्सगंज कोतवाली परिसरात एक संतापजनक घटना घडली. येथे एक सहा वर्षांची मुलगी दुकानातून ब्रेड खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली. यादरम्यान, एका 13 वर्षांच्या मुलाने तिला आमिष दाखवून जवळच्या प्राथमिक शाळेत नेलं आणि तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं.
कुटुंबियांना सांगितला सगळा प्रकार
घटनेनंतर पीडित तरुणीने रडत रडत तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर, पीडितेला जवळील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी संबंधित मुलीची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान, पीडितेच्या आईने कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणासंदर्भात तक्रार नोंदवली. तक्रार करताना पीडिता घटनेच्या दिवशी चार वाजता दुकानात गेल्याचं मुलीच्या आईने सांगितलं.
हे ही वाचा: बीड: एक बॉयफ्रेंड आणि दोघी जणी... होमगार्ड महिला 'त्याच्या' जवळ गेली अन् मैत्रिणीने केलं भलतंच!
पीडितेचा भाऊ बहिणीच्या शोधात गेला अन्...
त्यावेळी गावातील एका मुलाने तिला एका निर्जन ठिकाणी नेलं आणि तिथे आरोपी तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. त्या ठिकाणी जवळच खेळणाऱ्या एका दुसऱ्या मुलाने ही घटना पाहिली आणि याबाबत माहिती दिली. पीडितेचा मोठा भाऊ तिला शोधण्यासाठी बाहेर पडला असता ती चौकात रडताना आढळली. मुलीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते. यावरूनच पीडितेच्या भावाला तिच्यासोबत काहीतरी भयानक घडल्याची जाणीव झाली.
तातडीने रुग्णालयात दाखल
भावाने तात्काळ कुटुंबियांना घटनेची माहिती दिली आणि यासंदर्भात पोलिसांना देखील कळवण्यात आलं. पोलिसांनी तातडीने कारवाई करत पीडितेला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात डॉक्टरांनी तिची प्रकृती ठिक असल्याचं सांगितलं. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.










