आली लहर केला कहर... भर पुराच्या पाण्यात टेबल टाकून मद्यपान करणाऱ्या काकांची जोडी! Video प्रचंड व्हायरल

इमारतीच्या परिसरात पुराचं पाणी शिरलेलं असताना दुसरीकडे त्याच इमारतीमधील दोन इसम हे पाण्यामध्ये खुर्चीवर बसून मद्यपान करीत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. जो प्रचंड व्हायरल होत आहे.

a pair of uncles drinking alcohol while sitting on a table and chair in floodwaters video goes viral mumbai rain

Viral Video Grab

मुंबई तक

• 04:27 PM • 20 Aug 2025

follow google news

मुंबई: मुंबईत सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आणि पुरस्थितीने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नागरी वस्त्यांमध्ये पुराचं पाणी शिरल्याचं यावेळी पाहायला मिळत आहे. बऱ्याच सखल भागातील इमारतींमध्ये देखील पाणी घुसल्याने अनेक नागरिकांची बरीच तारांबळ उडाली असल्याचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळाले आहेत. अशातच एक भलताच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती इमारती बाहेरच्या परिसरात पुराच्या पाण्यात अगदी निवांतपणे मद्यपान करताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल होत आहे. 

हे वाचलं का?

अनेक सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्याला काही तासांतच लाखो व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये इमारतीचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेलेला दिसत आहेत. जिथे दोन इसम अगदी मजेशीरपणे मद्यपानाचा आस्वाद घेताना यावेळी दिसून येत आहेत.

हे ही वाचा>> मिठी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, तरुण गेला वाहून, धडकी भरवणारा Video व्हायरल

व्हिडिओत दिसत आहे की, पावसामुळे रस्ते आणि सखल भागात पाणी साचले असून, आसपास पाण्याचा प्रवाह सुरू आहे. यावेळी दोन व्यक्ती इमारतीच्या खालच्या परिसरात खुर्ची आणि टेबल टाकून बसले आहेत. त्यावेळी टेबलावर दारूची बाटली आणि दोन दारूचे भरलेले ग्लासही दिसत आहेत. तसंच इतर दोन खुर्च्या देखील त्यांनी रिकाम्या ठेवल्या आहेत. दरम्यान, समोरच्या एका इमारतीमधून हा संपूर्ण व्हिडिओ शूट करण्यात आला आहे.

'त्या' व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून मजेशीर कमेंट्स

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी याला हास्यास्पद घटना मानत मजेशीर कमेंट्स केल्या, तर काहींनी हे वागणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. एका युजरने लिहिलंय, "पुरात मद्यपान? हा काय वेडेपण आहे!" तर दुसऱ्या युजरने पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.

हा व्हिडिओ पाहून अनेक नागरिकांनी चिंता देखील व्यक्त केली आहे, कारण अशा वेळी लोकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे. पुराच्या पाण्यातून होणारे आजार आणि अपघातांचा धोका लक्षात घेता, असं कृत्य चुकीचं आहे. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

हे ही वाचा>> गणपती बाप्पाच्या मूर्ती पुराच्या पाण्यात, मूर्तीकार महिलेचा टाहो तुमचंही काळजी टाकेल पिळवटून

मुंबईत पावसाचा कहर

मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून, अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. विशेषतः सखल भागात पाणी साचल्याने लोकांचे हाल होत आहेत. सध्या मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

    follow whatsapp