सांगलीत भरधाव वेगाने आलेल्या कारने 5-6 वाहनांना दिली धडक, 7 जण गंभीर जखमी, संतप्त जमावाकडून ड्रायव्हरला मारहाण

Sangli Hit And Run : सांगली शहरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. शहरातील बालाजी मिल रोड परिसरात 23 नोव्हेंबर रोजी रविवारी रात्री उशिरा हिट अँड रनचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या भीषण अपघातात सात जण जखमी झाले असून पाच ते सहा वाहनांचा चेंदामेंदा झाल्याची घटना आहे.

Sangli Hit And Run

Sangli Hit And Run

मुंबई तक

• 03:51 PM • 24 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

भरधाव वेगाने आलेल्या कारने वाहनांना उडवलं

point

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघाताचा तपास 

point

संतप्त जमावाकडून ड्रायव्हरला मारहाण

Sangli Hit And Run : सांगली शहरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. शहरातील बालाजी मिल रोड परिसरात 23 नोव्हेंबर रोजी रविवारी रात्री उशिरा हिट अँड रनचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या भीषण अपघातात सात जण जखमी झाले असून पाच ते सहा वाहनांचा चेंदामेंदा झाल्याची घटना आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. हिट अँड रनसारखी घटना आधी पुणे, नंतर मुंबई आणि आता सांगलीत घडली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Dharmendra Passed Away : अलविदा धर्मेंद्रजी! वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भरधाव वेगाने आलेल्या कारने वाहनांना उडवलं

प्रत्यक्षदर्शींनी या प्रकरणाबाबत माहिती दिली की, या अपघातात स्कोडा कंपनीची कार हि चुकीच्या बाजूने भरधाव वेगाने आली. तेव्हा ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले. त्याच अपघातादरम्यान, सर्वप्रथम एका टुव्हिलरला आणि नंतर आणखी चार वाहनांना जोराची धडक दिली होती. पुढे रस्त्याच्या कडेला जाऊन ती गाडी धडकली. एक वाहन पलटी झाले आणि त्या ड्रायव्हरचा अपघात झाला, तसेच इतर वाहनांचेही मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघाताचा तपास 

या भीषण अपघातात जखमींना प्रत्यक्षदर्शींनी नजीकच्या रुग्णालयात पाठवण्यात आले होते. यापैकी दोघांची प्रकृती ही गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघाताचा तपशील गोळा करण्यात आला. 

हे ही वाचा : श्रीमंताला मुलगी देऊ नका, त्यांच्या नादी लागू नका; आत्महत्या केलेल्या गौरी पालवेच्या वडिलांनी टाहो फोडला

संतप्त जमावाकडून ड्रायव्हरला मारहाण

 

या प्रकरणादरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी धडक दिलेल्या कारचालकाला बेदम मारहाण केली आहे. त्यानंतर त्याच्या गाडीची तोडफोडही करण्यात आली. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर काही वेळ वाहतूक सुविधा विस्कळीत झाली होती. या प्रकरणाचा पुढील तपास हा विश्रामबाग पोलीस करत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

    follow whatsapp