Dharmendra Passed Away : अलविदा धर्मेंद्रजी! वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Dharmendra Passed Away : आज 24 नोव्हेंबर रोजी वयाच्या 89 व्या वर्षी धर्मेंद्रजींनी अखेर श्वास घेतला. या घटनेनं हिंदी सिनेक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
12 दिवसानंतर धर्मेंद्रजींची प्राणज्योत मालवली
प्रकृती चिंताजनक असताना काय घडलं?
'ही-मॅन' किताबाचे मानकरी धर्मेंद्र
Dharmendra Passed Away: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्गज अभिनेते धर्मेंद्र देओल यांची काही दिवसांपासून प्रकृती अधिकच चिंताजनक होती. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. पण, अखेर आज 24 नोव्हेंबर रोजी वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेर श्वास घेतला. या घटनेनं हिंदी सिनेक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
हे ही वाचा : 12 वर्षानंतर नवपंचम राजयोग, काही राशीतील लोकांवर पडणार पैशांचा पाऊस
अखेर 12 दिवसानंतर धर्मेंद्रजींची प्राणज्योत मालवली
काही दिवसांपूर्वी त्यांच्या मृत्यूच्या बातमीची चर्चा माध्यम स्तरातून समोर येऊ लागली. परंतु धर्मेंद्रची मुलगी ईशा आणि पत्नी हेमा मालिनीने ही बातमी खोटी असल्याचे सांगत x वर ट्विट करत माध्यमांना सुनावलं होतं. 12 नोव्हेंबर रोजी म्हणजेच 12 दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. पण, आता त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे.
प्रकृती चिंताजनक असताना काय घडलं?
प्रकृती चिंताजनक असताना, त्यांच्या घरी अभिनेता सनी देओल, मुलगी ईशा देओल हे धर्मेंद्रच्या घरी पोहोचले होते. अशातच अभिनेत्याच्या घराबाहेर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. तर काही ठिकाणी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. पण प्रकृती बघता, अनेक अभिनेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी देखील त्यांची भेट दिली.
'ही-मॅन' किताबाचे मानकरी धर्मेंद्र
एका सर्वसामान्य पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या मुलाने हिंदी सिनेमातील ही-मॅन हा किताब मिळवला, त्या किताबामागची एक रंजक गोष्ट आहे. सिनेसृष्टी गाजवणाऱ्या धर्मेंद्र यांचे मूळ नाव कृष्ण देओल होते. पण, चित्रपटसृष्टीत त्यांची धर्मेंद्र नावाने ओळख निर्माण झाली होती. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली गावात झाला होता.










