Wai accident : साताऱ्यातील वाईमधून एका भीषण अपघाताची माहिती समोर येत आहे. वाई शहरात एका रोड रोलरचा भीषण अपघात झाला आहे. रोड रोलरचा ब्रेक फेल झाल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातवरण पसरल्याचे पहायला मिळाले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : ठाकरेंच्या उमेदवारासाठी रवीना टंडनचा प्रचार, पण 'त्या' वार्डात निकाल काय आला? अभिनेत्री परदेशात गेल्याने चर्चेला उधाण
'असा' झाला अपघात
वाई शहरातील किसनवीर चौकातील सिद्धीविनायक वडापावजवळ आज सकाळी सुमारे 11 वाजता रोड रोलरचा भीषण अपघात झाला. रोड रोलरचा अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. मात्र प्रसंगावधान राखत चालकाने आणि नागरिकांनी जोरात आरडा-ओरडा करत रस्त्यावरील लोकांना बाजूला केले. हा रोड रोलर वाईतील खामकर चौकात असलेल्या सिद्धीविनायक वडापावच्या शेजारील हाराच्या दुकानात घुसला. यामुळे दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.
शहरात काही काळ रंगला थरार
रोड रोलरचा ब्रेक फेल झाल्यानंतर चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली. चालकाने आणि आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यामुळे रस्त्यावरुन चाललेले लोक बाजूला झाले. यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र हा रोड रोलर एका हाराच्या दुकानात शिरल्याने दुकानाचे मोठे नुकसान झाले. चालकाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली असली तरी शहरात काही काळ थरार रंगल्याचे पहायला मिळाले.
हे ही वाचा : धनंजय मुंडेंसह वाल्मिक कराडला मोठा दणका, 'तो' खटला पुनरुज्जीवित; नेमकं काय घडलं?
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
या अपघातात जीवितहानी टळली तरी घटनेनंतर नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून पुढील तपास सुरू आहे. सुदैवाने जीवितहानी टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
ADVERTISEMENT











