धनंजय मुंडेंसह वाल्मिक कराडला मोठा दणका, 'तो' खटला पुनरुज्जीवित; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Dhananjay Munde court case : जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक केल्याच्या आरोपावरून माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह तिघांविरुद्ध सुरू असलेला कायदेशीर लढा आता पुन्हा तीव्र झाला आहे. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला दोषमुक्तीचा आदेश रद्द ठरवत, अंबाजोगाई येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने हा खटला पुन्हा सुरू करण्याचे (पुनरुज्जीवित) आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

dhananjay munde
dhananjay munde
social share
google news

बातम्या हायलाइट

point

धनंजय मुंडेंसह वाल्मिक कराडला मोठा दणका

point

अंबाजोगाई येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात खटला पुन्हा सुरू

point

जाणून घ्या न्यायालयात नेमके काय घडले?

Dhananjay Munde court case, रोहिदास हातागळे/बीड : जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक केल्याच्या आरोपावरून माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह तिघांविरुद्ध सुरू असलेला कायदेशीर लढा आता पुन्हा तीव्र झाला आहे. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला दोषमुक्तीचा आदेश रद्द ठरवत, अंबाजोगाई येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने हा खटला पुन्हा सुरू करण्याचे (पुनरुज्जीवित) आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा : 27 महापालिका जिंकू म्हणणारी भाजपा फक्त 9 ठिकाणी स्वबळावर तर 15 ठिकाणी कुबड्यावर...', सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

नेमके प्रकरण काय आहे?

अंबाजोगाई तालुक्यातील पुस व तळणी शिवारातील शेतकरी मुंजा किशनराव गित्ते यांची मौजे पूस शिवारातील गट नं. २८ मधील ३ हेक्टर १२ आर जमीन 'जगमित्र शुगर मिल्स' या नियोजित कारखान्यासाठी २०११-१२ मध्ये खरेदी करण्यात आली होती. ही जमीन खरेदी करताना धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि सूर्यभान मुंडे यांनी फिर्यादीसह इतर साक्षीदारांना कारखान्यात नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. केवळ ५० लाख रुपयांत हा व्यवहार ठरला होता. ठरलेल्या ५० लाख रुपयांपैकी केवळ १० लाख रुपये फिर्यादीला मिळाले. उर्वरित ४० लाख रुपयांचा धनादेश (क्र. १७९२७४) बँकेत अनादरीत झाला. वारंवार पाठपुरावा करूनही पैसे न मिळाल्याने मुंजा गित्ते यांनी अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी तपास करून धनंजय मुंडे व इतरांविरुद्ध भा.दं.वि. कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४१९, ३४ अन्वये दोषारोपपत्र दाखल केले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp