Mumbai and Maharashtra Weather Update: मुंबई: मुंबई आणि उपनगरात पुढील 3 ते 4 तास मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने ट्विटरवरून याबाबतची नेमकी माहिती दिली आहे. तर कोकण किनारपट्टी भागात देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मागील 3-4 दिवसामध्ये मुंबई आणि कोकणात चांगला पाऊस बरसत आहे. तर महाराष्ट्रात देखील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. जाणून घेऊयात सध्या हवामानाची नेमकी स्थिती कशी आहे. (accurate forecast of rain in mumbai and maharashtra weather news there will be heavy rain in mumbai in next 3 to 4 hours an alert issued by imd 18th july 2024 rain forecast)
ADVERTISEMENT
महाराष्ट्र हवामान अपडेट (Maharashtra Weather Alert)
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हवामानाचे अंदाज आणि मुंबईतील पावसाचा नेमका अंदाज
मुंबईत पुढील 3-4 तास मुसळधार पावसाची शक्यता
येत्या 3 ते 4 तासात मुंबई आणि परिसरात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी आज (18 जुलै) यलो अलर्ट दिला आहे. पण आता नव्या अपडेटनुसार काही भागात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा>> Nashik News : पावसात फिरायला गेले आणि अडकले...,अंजनेरी गडावर भयंकर थरार
तर पश्चिम किनारपट्टीवर (कोकण, गोवा, महाराष्ट्र) काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
17.07.2024 रोजी सकाळी 8:30 वाजेपासून सांयकाळी 5:30 वाजेपर्यंत मुंबई, कोकण आणि गोव्यात बऱ्यापैकी पाऊस पडला. मुंबईतील कुलाबा वेधशाळेत 5 सेमी. पावसाची नोंद झाली तर सांताक्रूझ वेधशाळेत 3 सेमी पावसाची नोंद करण्यात आली. तर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात काल दिवसभरात 16 सेमी पाऊस पडला तर गोव्यातील पणजीमध्ये 9 सेमी. पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईतील लोकल ट्रेन सेवा उशिराने, सखल भागातही साचलं पाणी
मुंबईत मागील काही तासापासून पावसाची संततधार ही सुरूच आहे. ज्याचा परिणाम हा मुंबईतील लोकल सेवेवर झालेला पाहायला मिळतो आहे. मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूक ही बरीच उशिराने सुरू आहे.
हे ही वाचा>> Mumbai Weather Forecast: मुंबईकरांना पाऊस झोडपणार! IMD चा अंदाज काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पावसाची संततधार सुरू असल्याने मध्य रेल्वे ही 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. तर पश्चिम मार्गावरील रेल्वे या ही 10 मिनिटं उशिराने धावत आहे. तर हार्बर रेल्वे देखील 10 मिनिट उशिराने सुरू आहे. यामुळे अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची बरीच गर्दी पाहायला मिळत आहे.
याशिवाय मुंबईतील दादर पूर्व, माटुंगा-सायन किंग्ज सर्कल यासारख्या सखल ठिकाणी पाणी साचत असल्याचं समजतं आहे.
ADVERTISEMENT
