Mumbai Weather Forecast: मुंबईकरांना पाऊस झोडपणार! IMD चा अंदाज काय?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सध्या पावसामुळे मुंबई शहरासह उपनगराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

point

मुंबईसाठी पुढील 36 तास महत्त्वाचे आहेत. या काळात 200 मिमी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

point

रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी!

Monsoon 2024 Rain Today Weather News Live Updates : मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा जोर आजही कायम आहे. मुंबईत पुढील आठवडाभर मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. रविवारी (14 जुलै) अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस बरसला. तर, आज (सोमवार 15 जुलै) आणि उद्या (मंगळवार 16 जुलै) रविवारपेक्षा जास्त पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज, हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Mumbai Weather Forecast live updates today 15 july 2024 IMD Alert Maharashtra rain news )

ADVERTISEMENT

जरी, मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झाली असली तरी, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, हार्बर मार्गासह सर्वच मार्गावरील मुंबई लोकल सेवा सुरळीत सुरू आहेत. मुंबईसाठी पुढील 36 तास महत्त्वाचे आहेत. या काळात 200 मिमी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा : Chhagan Bhujbal : शरद पवारांची भेट का घेतली? भुजबळांनी अखेर कारण केले उघड

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील पावसाने गेल्या वर्षीच्या तुलनेत शहराने 1,000 मिमी पावसाचा टप्पा ओलांडला आहे. IMD ने म्हटले आहे की, ताज्या आकडेवारीनुसार, कुलाबा स्टेशनवर 1,074.6 मिमी आणि सांताक्रूझ स्टेशनवर 1,089.21 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर आनंदाची बातमी म्हणजे, वरुणराजा मनसोक्त बरसत असल्याने मुंबई शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्येही पाण्याचा साठा वाढला आहे.

हे वाचलं का?

 

हेही वाचा : IAS पूजा खेडकरांचे आई-वडील गायब; पोलिसांनी दिली महत्त्वाची अपडेट!

रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी!

रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर व माणगाव या तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना 15 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. तर, मंगळवारी (16 जुलै) या जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने यादिवशीही शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असण्याची दाट शक्यता आहे. 
 

ADVERTISEMENT

  

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT