Chhagan Bhujbal : शरद पवारांची भेट का घेतली? भुजबळांनी अखेर कारण केले उघड
Chhagan Bhujbal meets Sharad Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट का घेतली?

पवारांसोबत भुजबळ यांची काय झाली चर्चा?

सिल्व्हर ओकवर छगन भुजबळ का गेले होते?
Chhagan Bhujbal Sharad Pawar Meeting Latest News : छगन भुजबळ यांनी आज मुंबईतील सिल्व्हर ओक येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात भुजबळ यांनी पवारांवर टीका केली होती. त्यानंतर आज भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. अखेर पत्रकार परिषद घेत भुजबळ यांनी मौन सोडले. (Why did Chhagan Bhujbal Meets to Sharad Pawar)
बारामती येथील जन सन्मान रॅली कार्यक्रमामध्ये बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार यांनी आरक्षणासारख्या सामाजिक प्रश्नावर पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहनही भुजबळ यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी आज पवारांची भेट घेतली.
छगन भुजबळ शरद पवारांना का भेटले?
शरद पवार यांच्या भेटीनंतर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, "मी पवारसाहेबांकडे गेलो होतो. मी त्यांची वेळ घेतली नव्हती. ते घरी आहेत, इतकं मला कळलं होतं. मी गेलो तेव्हा ते तब्येत बरी नसल्याने झोपलेले होते. मी एक दीड तास थांबलो."
हेही वाचा >> "क्रॉस व्होटिंगमध्ये माझे नाव आल्याचे पाहिले अन्...", आमदार चौधरींनी सोडलं मौन
"ते उठले आणि त्यांनी मला बोलावलं. तब्येत बरी नसल्याने ते बिछान्यावरच झोपलेले होते. मी तिथेच खुर्ची घेऊन बसलो. आम्ही जवळपास दीड तास चर्चा केली. मी त्यांना सांगितले की, मी राजकारण घेऊन आलेलो नाही. मी मंत्री, आमदार किंवा कुठली पक्षीय भूमिका माझी नाही."