जामखेड : माझा नंबर का ब्लॉक केला? संतापलेल्या गेवराईच्या तरुणाने नृत्यांगणेवर केले कोयत्याने वार

मुंबई तक

• 08:22 AM • 11 Feb 2026

Ahilyanagar Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, खळेगाव (ता. गेवराई, जि बीड) येथील रहिवासी असलेला आरोपी राहुल अशोक कचरे आणि पीडित महिला यांच्यात मागील पाच वर्षांपासून मैत्रीचे संबंध होते. मात्र, राहुल याच्या त्रासाला कंटाळून महिलेने यापूर्वीही त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. गुरुवारी रात्री आरोपीने फोन करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

Ahilyanagar Crime News

Ahilyanagar Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

जामखेड : माझा नंबर का ब्लॉक केला?

point

संतापलेल्या गेवराईच्या तरुणाने नृत्यांगणेवर केले कोयत्याने वार

Ahilyanagar Crime News :  जामखेड शहरातील तपनेश्वर भागात एका सांस्कृतिक कला केंद्रातील 26 वर्षीय नृत्यांगनेवर तिच्याच मित्राने कोयत्याने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील मुख्य संशयित आरोपी हा गेवराई तालुक्यातील असून, “तू माझ्याशी फोनवर का बोलत नाहीस? माझा नंबर का ब्लॉक केला?" असा जाब विचारत त्याने हा रक्तरंजित हल्ला चढवला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जामखेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त खास व्याख्यानमाला, मोहन भागवत काय काय म्हणाले?

मिळालेल्या माहितीनुसार, खळेगाव (ता. गेवराई, जि बीड) येथील रहिवासी असलेला आरोपी राहुल अशोक कचरे आणि पीडित महिला यांच्यात मागील पाच वर्षांपासून मैत्रीचे संबंध होते. मात्र, राहुल याच्या त्रासाला कंटाळून महिलेने यापूर्वीही त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. गुरुवारी रात्री आरोपीने फोन करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर शुक्रवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास जेव्हा महिला आपल्या खोलीवर होती, तेव्हा आरोपीने तेथे दबा धरून प्रवेश केला. आरोपीने रागाच्या भरात महिलेच्या हातावर, बोटांवर आणि डोक्यावर कोयत्याने सपासप वार केले. पीडित महिलेच्या मैत्रिणीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिलाही धमकावले आणि “मी तुला संपवूनच टाकणार" असे म्हणत घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी 26 वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून राहुल अशोक कचरे (रा. खळेगाव, ता. गेवराई) याच्या विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांची न्यायालयाकडून सुटका, शिंदेवाडी कोर्टाचा मोठा निर्णय