अमरावती : घराच्या दुरुस्तीसाठी आलेल्या मिस्त्रीच्या प्रेमात आकंठ बुडाली, विवाहितेने नवऱ्याला फिल्मी प्लॅन आखून संपवलं

Amravati Crime : अमरावती : घराच्या दुरुस्तीसाठी आलेल्या मिस्त्रीच्या प्रेमात आकंठ बुडाली, विवाहितेने नवऱ्याला फिल्मी प्लॅन आखून संपवलं

Amravati Crime

Amravati Crime

मुंबई तक

15 Nov 2025 (अपडेटेड: 15 Nov 2025, 04:22 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अमरावती : घराची दुरुस्तीसाठी आलेल्या मिस्त्रीच्या प्रेमात आकंठ बुडाली

point

विवाहितेने नवऱ्याला फिल्मी प्लॅन आखून संपवलं

अमरावती : अमरावतीत घडलेल्या युवकाच्या हत्येच्या तपासात पोलिसांनी अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आणलाय. घराची दुरुस्ती करण्यासाठी वर्षभरापूर्वी आलेल्या मिस्त्रीशी अनैतिक संबंध जुळल्यानंतर एका विवाहितेने पतीचा अडथळा दूर करण्यासाठी थेट खूनाचा कट रचला. पोलिसांनी या गुन्ह्यात पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

हे वाचलं का?

प्रकरण कसं उघडलं?

अमरावतीतील भानखेडा रोडच्या जंगलात 12 नोव्हेंबरच्या रात्री एका पुरुषाचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृताची ओळख प्रमोद बकाराम भलावी (42) अशी पटली. गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांच्या पथकाने काही तासांतच या प्रकरणात तपास करत प्रमोदची पत्नी छाया आणि तिचा प्रियकर विश्वंभर दिगंबर मांजरे (39) यांना बेड्या ठोकल्या.

प्रेमसंबंधांनी घेतलं भयावह वळण

प्रमोद चंद्रपूरमध्ये नोकरी करत होता, तर छाया सात वर्षांपासून अंजनगाव बारी येथे मुलांसह राहत होती. घरातील दुरुस्तीच्या कामादरम्यान तिची ओळख विश्वंभरशी झाली आणि त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले. काही दिवसांतच पतीने या नात्याची चाहूल घेतल्याचं छायाला जाणवू लागलं. त्यानंतर छायाने प्रियकराला सांगितले, "आपल्या संबंधांबद्दल प्रमोदला शंका आली आहे. तो आणि त्याची एक महिला नातेवाईक मला सतत त्रास देतात. आता त्याला संपवलं पाहिजे.

हेही वाचा : "तो माझ्या बायकोला घेऊन..." रेल्वे स्टेशनवर रक्तबंबाळ अवस्थेत आढळला तरुण! पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...

जंगलात खूनाचा प्लॅन

विश्वंभरने छायाला पतीला बाहेर घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार 10 नोव्हेंबर रोजी दोघांनी दस्तूरनगरात जेवण करून नेरपिंगळाई येथे देवीचं दर्शन घेतलं आणि परतताना बाजारातून कोयता खरेदी केला. संध्याकाळी छायाने पती प्रमोदला फोन करून भेटायला बोलावलं. प्रमोद दुचाकीवरून आल्यावर, जंगलाजवळ छायाने लघुशंकेचा बहाणा करत थांबायला सांगितलं. छाया व प्रमोद खाली उतरल्याबरोबर झाडीत लपून बसलेला विश्वंभर बाहेर आला आणि प्रमोदच्या मानेवर कोयत्याचे जोरदार वार केले.

ओळख लपवण्यासाठी क्रूर कृत्य

प्रमोद मरण पावल्याची खात्री झाल्यावर दोघांनी मृतदेह नाल्याशेजारी ओढत नेऊन फेकला. दुचाकीही तिथेच ठेवली. चेहरा ओळखू नये म्हणून दगडाने मारहाण करून विकृत केला. त्यानंतर दोघं रात्री जवळपास 11 वाजता अंजनगाव बारीला पोहोचले. छायाने प्रमोदचा मोबाइल स्वतःकडे ठेवला आणि त्यातील सीम तोडून फेकून दिलं. प्रियकर त्या रात्री तिच्या घरीच थांबला. छायाने दुसऱ्या दिवशी प्रमोदच्या बेपत्ता होण्याचा गुन्हा नोंदवला. मात्र पती कोणासोबत गेला याबाबत तिने पोलिसांना चुकीची माहिती देत असल्याचे उघड झाल्याने तिच्यावर संशय वाढला. चौकशीत तिचे विश्वंभरसोबतचे नाते उघड झाले. कडक चौकशीदरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांनी सांगितले. घटनास्थळावरून खुनासाठी वापरलेला कोयता जप्त करण्यात आला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शाळेत उशिरा आल्याने शिक्षिकेने 100 उठाबशा काढायला सांगितल्या, वसईतील 6 वीत शिकणाऱ्या अंशिकाचा बालदिनीच मृत्यू

    follow whatsapp