Meerut News: आपल्या नवऱ्याची खुपणारी दाढी सुद्धा नात्यामध्ये मोठा वाद निर्माण होण्याला कारणीभूत ठरू शकते. याचं उदाहरण मेरठमधील अर्शीने दाखवून दिले. खरंतर, मेरठमधील एका महिलेला आपल्या मौलाना पतीची दाढी आवडत नव्हती आणि म्हणून बायकोनं नवऱ्यावर दाढी कापून टाकण्याचा दबाव टाकला. मात्र, पतीने यावर नकार दिल्यानंतर याचे परिणाम मोठ्या कौटुंबिक वादात दिसून आले. या वादामुळे बायको कोणा दुसऱ्यासोबतच पळून गेली. मेरठमधील लिसाडी गेट क्षेत्रात अशी वेगळीच घटना घडल्याचं समोर आलं आहे. पतीने पोलिसांकडून न्यायाची मागणी केली आहे. हे नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, नेमकं काय घडलं?
शाकीर नावाच्या एका तरुणाचे सात महिन्यांपूर्वीच इंचौलीमध्ये राहणाऱ्या अर्शीसोबत लग्न झालं होतं. शाकिर पेशाने मौलाना असून त्यांच्या धार्मिक परंपरेनुसार, ते दाढी ठेवतात. लग्नाच्या काही काळानंतर अर्शीला तिच्या नवऱ्याची दाढी खुपत होती आणि यामुळे तिने तिच्या नवऱ्यावर दाढी कापण्याचा दबाव टाकला. ती तिच्या नवऱ्याला म्हणाली, "जर सोबत राहायचं असेल तर दाढी कापावी लागेल." शाकिर यांनी अर्शीला म्हणण्याला विरोध केल्यानंतर तिने आपल्या नातेवाईकांकडे याची तक्रार केली.
प्रेमसंबंधाचा संशय
यादरम्यान, आपल्या पत्नीचे तिच्या दीरासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय शाकिर यांना आला. 3 फेब्रुवारी रोजी अर्शी आपल्या दीरासोबत पळून गेल्याचं सांगितलं जात आहे. बदनामीच्या भितीने शाकिर यांनी आपल्या नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या मदतीने त्यांच्या पत्नी आणि भावाचा तपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातून काहीच त्यांच्याबाबतीत कोणतीच माहिती मिळाली नाही.
पोलिसांनी केली तपासाला सुरूवात
आता, शाकिर यांनी यासंबंधिची तक्रार पोलिसांकडे नोंदवली आहे. तसेच त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची पत्नी आणि त्यांचा भाऊ घरातून पळून गेले आणि त्यासोबतच त्यांनी 5 लाख रुपये खंडणी देण्याचा दबाव सुद्धा त्यांच्यावर टाकला होता. एसपी सिटी आयुष विक्रम सिंह यांनी सांगितल्याप्रमाणे, या घटनेचा तपास सुरू आहे आणि आरोपींचा शोध लागल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
ADVERTISEMENT
