Maharashtra Day: 65 वर्षांपूर्वी महाराष्ट्र कसं बनलेलं वेगळं राज्य, तुम्हाला माहितीए का महाराष्ट्राची ही रक्तरंजित कहाणी?

Maharashtra Day: दोन्ही बाजूंच्या मागण्या लक्षात घेऊन स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला द्यायला नकार दिला होता. मुंबई आपल्याला मिळणार नाही ही माहिती जेव्हा मराठी भाषिकांपर्यंत पोहोचली, तेव्हा लोकांमध्ये राग निर्माण झाला होता.

Mumbai Tak

मुंबई तक

30 Apr 2025 (अपडेटेड: 30 Apr 2025, 02:50 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मराठी आणि गुजराती भाषिकांचा 'मुंबई'साठी संघर्ष

point

मुंबई महाराष्ट्राला देण्यासाठी राज्य पुनर्रचना आयोगाने दिला होता नकार

point

महाराष्ट्र राज्य स्थापन होण्यासाठी कसा करावा लागला होता संघर्ष?

Maharashtra Din : 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळालं. मात्र, महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य नव्हतं. देशाला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. पुढे हळूहळू देशातील वेगवेगळी राज्य, भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली. 

हे वाचलं का?

1956 च्या राज्य पुनर्रचना कायद्याअंतर्गत अनेक राज्यांची निर्मिती करण्यात आली. या कायद्याअंतर्गत कन्नड भाषिकांसाठी कर्नाटक, तेलगू भाषिकांना आंध्र प्रदेश, मल्याळम भाषिकांसाठी केरळ आणि  आणि तमिळसाठी तामिळनाडू राज्यांची निर्मिती करण्यात आली. 

मराठी-गुजराती एकाच प्रांतात

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठी आणि गुजराती भाषा बोलणारी लोकं तेव्हाच्या बॉम्बे प्रांतात म्हणजे एकाच राज्यात होती. पण पुढे इतर राज्यांप्रमाणे आम्हालाही वेगळं राज्य मिळावं अशी मागणी होऊ लागली. मराठी आणि गुजरातीच्या आधारावर भाषावार प्रांत रचना व्हावी अशी मागणी जोर धरत होती. गुजराती भाषिकांना स्वत:चं वेगळं राज्य हवं होतं. तर, मराठी भाषिक नागरिकही स्वतंत्र राज्याची मागणी करत होते. या मागणीसाठी अनेक आंदोलनं झाली. 

हे ही वाचा >> रक्ताच्या थारोळ्यात बाथरूममध्ये आढळला शिकाऊ डॉक्टरचा मृतदेह, सोलापूर पुन्हा हादरलं, घटना काय?

दोन्ही बाजूंच्या मागण्या लक्षात घेऊन स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला द्यायला नकार दिला होता. मुंबई आपल्याला मिळणार नाही ही माहिती जेव्हा मराठी भाषिकांपर्यंत पोहोचली, तेव्हा लोकांमध्ये राग निर्माण झाला. मुंबई मराठी माणसांपासून तोडली जात असल्याच्या भावनेतून चीड निर्माण झाली. 

मुंबईतील फ्लोरा फाऊंटनजवळ काय घडलं होतं? 

ठिकठिकाणी लोकांच्या चर्चांमध्ये, बैठकांमध्ये, आंदोलनांमध्ये याबद्दल संताप व्यक्त केला जात होता. आंदोलनं सुरू झाली होती. याच काळात 21 नोव्हेंबर 1956 चा दिवस उगवला. मुंबईमध्ये आंदोलकांनी तत्कालीन सरकारचा निषेध करत एक मोर्चा काढला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणाऱ्या घोषणांनी मुंबई अक्षरश: दणाणून सोडली. एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून आणि दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलक फ्लोरा फाऊंटनजवळ जमले. पोलिसांना हा मोर्चा आवरणं कठीण झालं होतं. 

त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर सुरूवातीला लाठीचार्ज केला. पण पेटलेल्या आंदोलनकांना रोखणं तसंही शक्य झालं नाही. लाठीचार्जला आंदोलकांनी जुमानलं नाही. अखेर मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले. पोलिसांनी गोळीबार केला आणि या गोळीबारात 15 आंदोलकांना हौतात्म्य आलं. 300 आंदोलक जखमी झाले. 

सरकारला झुकावं लागलं, मुंबई महाराष्ट्राला दिली

या बलिदानामुळे जनतेचा दबाव वाढला, तरीही केंद्र सरकारने त्वरित निर्णय घेण्याऐवजी चर्चा आणि नवीन योजना पुढे आणत राहिलं.या घटनेनंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीला व्यापक पाठिंबा मिळाला, पण सरकारने आंदोलन दडपण्यासाठी कठोर पावलं उचलली. 

हे ही वाचा >> सासू आधी जावयासोबत पळून गेली, आता म्हणतेय मला माझा नवराच हवा.. नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्रात हे आंदोलन सुरू असताना दुसरीकड गुजरातमध्येही महागुजरात आंदोलन तीव्र होत होतं. त्यामुळे केंद्रासमोर हा प्रश्न अडचणीचा झाला होता. 1956 नंतरच्या आंदोलनांमुळे आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या दबावामुळे सरकारला अखेर झुकावं लागलं  आणि 1960 मध्ये मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर करावा लागला, ज्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन स्वतंत्र राज्ये निर्माण झाली.  अशा पद्धतीनं मोठ्या संघर्षानंतर, हुतात्म्यांनी रक्त सांडल्यानंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र हे स्वतंत्र  राज्य झालं.



 

    follow whatsapp