सासू आधी जावयासोबत पळून गेली, आता म्हणतेय मला माझा नवराच हवा.. नेमकं प्रकरण काय?
UP News: गोंडामधील एक सासू आपल्या होणाऱ्या जावयासोबत पळून गेली. सोशल मीडियावर सुद्धा या चर्चेला उधाण आल्याचं पाहायला मिळतंय. महिलेच्या पतीने पोलिसांना नेमकं काय सांगितलं? याबाबतीत नवीन माहिती समोर आली आहे. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

गोंडामधील पुन्हा एक सासू जावयासोबत गेली पळून

सासूने व्यक्त केली नवऱ्याकडे परत जाण्याची इच्छा

नेमकं प्रकरण काय?
UP News: अलीगढमधील सासू आणि जावयाची प्रेमकहानी तर चर्चेचा विषय ठरलीच. मात्र, आता त्यानंतर पुन्हा गोंडामधील एक सासू आपल्या होणाऱ्या जावयासोबत पळून गेली. सोशल मीडियावर सुद्धा या चर्चेला उधाण आल्याचं पाहायला मिळतंय. पळून गेलेल्या 44 वर्षीय सासूचं नाव उषा देवी असून तिच्या होणाऱ्या जावयाचं नाव राम स्वरूप असल्याचं सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उषा देवीच्या मुलीचं लग्न वस्तीमध्ये राहणाऱ्या राम स्वरूप नावाच्या मुलाशी ठरलं होतं. मात्र, काही कारणांमुळे हे लग्न मोडलं. यानंतर, उषा देवी ही आपल्या होणाऱ्या जावयासोबतच म्हणजेच राम स्वरूपसोबत पळून गेल्याची बातमी समोर आली. या घटनेसंबंधी आता एक नवीन ट्विट समोर आलं आहे. महिलेच्या पतीने पोलिसांना नेमकं काय सांगितलं? याबाबतीत नवीन माहिती समोर आली आहे. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
हे ही वाचा: चौथ्यांदा मुलगीच झाली, जिथं प्रसूती झाली त्याच रुग्णालयात आईने स्वत:... धक्कादायक घटना
पोलीस अक्षीक्षकांना लिहिलेल्या पत्रात काय सांगितलंय?
गोंडाच्या खोडारे क्षेत्रातील पोलिस स्टेशनच्या SHO ने जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबतीत पत्र लिहिलं होतं. त्या पत्रानुसार, उषा देवीचे पती म्हणजेच किशन यांनी पोलिसांना सांगितले की त्याची पत्नी 25 तारखेला अचानक बेपत्ता झाली. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची पत्नी आपल्या मुलीचे लग्न ज्याच्याशी आधीच ठरले होते त्या माणसासोबत पळून गेली. त्या व्यक्तीचे नाव राम स्वरूप आहे. उषा देवीच्या मुलीचे राम स्वरूपसोबतचं लग्न मोडलं आणि आता तिचं लग्न पुढच्या महिन्यात दुसऱ्या मुलासोबत ठरलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

नवऱ्याकडेच परत जाण्याची इच्छा
तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अचानक बेपत्ता झालेली उषा देवी 29 एप्रिल रोजी राम स्वरूपसोबत त्यांच्या वस्तीतील दुबोलिया पोलिस स्टेशनला पोहोचली. तिथे उषा देवी स्वत:च्या इच्छेने राम स्वरूपसोबत पळून गेल्याचं तिने सांगितलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, उषा देवी आता तिचे पती किशनकडे परत येऊ इच्छिते. पोलिसांना सांगितले की उषा जेव्हा राम स्वरूपसोबत पळून गेली होती, तेव्हा तिने तिच्या सोबतच कोणतेच दागिने किंवा पैसे घेऊन गेली नव्हती. पोलिसांनी आता उषाला तिच्या पतीच्या म्हणजेच किशनकडे सोपवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
हे ही वाचा: Pahalgam Attack: 'त्या' बैठकीत PM मोदींसह अजित डोवालही, म्हणजे प्लॅन ठरलाय.. काय आहे Inside स्टोरी?