हेडफोन लावून दोघांच्या डोक्यात सुरु होतं रीलचं खूळ, अहमदाबाद एक्सप्रेसने दिली धडक, दोघांचाही मृत्यू... जळगावात हळहळ

Jalgaon News : सोशल मीडियावर अनेक रील्स स्टार्स प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. रील कंटेट बनवून अनेकांना एकाच रात्रीत प्रसिद्ध व्हायचं असतं, पण याचमुळे काही तरुणांना रील बनवणं आता जीवावर बेतलं आहे.

Jalgaon news two youths die after ahmedabad express hits them while making a reel

Jalgaon news two youths die after ahmedabad express hits them while making a reel

मुंबई तक

• 08:09 PM • 26 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

रील बनवण्याच्या नादात तरुणांनी गमावला जीव

point

अहमदाबाद एक्सप्रेस वेगाने येत असताना धडक

Jalgaon News : सोशल मीडियावर अनेक रील्स स्टार्स प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. रील कंटेट बनवून अनेकांना एकाच रात्रीत प्रसिद्ध व्हायचं असतं, पण, हेच रील बनवणं तरुणांच्या जीवावर बेतलं आहे. जळगावातील पाळधी गावात दोन तरुणांना रेल्वे रुळावर बसून रील बनवणं जीवाशी आलं आहे. रील बनवताना रेल्वेनं दोन तरुणांना धडक दिल्याने तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं घटनास्थळावरील परिसर हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : नागपूर हादरलं! नराधमांनी 13 वर्षीय मुलीला OYO हॉटेलवर नेत लैंगिक शोषण केलं, नंतर व्हिडिओ रेकॉर्ड करत...

रील बनवण्याच्या नादात तरुणांनी गमावला जीव

मृत तरुणांची नावे आता समोर आली आहेत. हर्षल नन्नवरे आणि प्रशांत खैरनार अशी मृत तरुणांची नावे आहेत. दोघेही तरुण 18 वर्षांचे होते, ते पाळधी गावातील रेल्वेनजीकच्या परिसरातील रहिवासी होते. पाळधी रेल्वे रुळावर बसून ते रील बनवण्याच्या नादात तरुणांनी आपला मोलाचा जीव गमावला. 

अहमदाबाद एक्सप्रेस वेगाने येत असताना धडक

पाळधी येथील रेल्वे गेटनजीकच रील बनवत असताना ही धक्कादायक घटना घडली. अहमदाबाद एक्सप्रेस वेगाने येत असताना धडक बसली. या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित प्रकरणात पाळधी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करण्याचे काम सुरु केला आहे. 

हे ही वाचा : चला पुण्याला म्हणत पहाटे साडे तीन वाजता लिफ्ट दिली, रस्त्यात गाडी थांबवून महिलेला झाडीत नेलं, नको तेच... लाज आणणारी घटना

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही कानात हेडफोन लावून रेल्वेरुळावर बसून रील बनवत होते. त्याचदरम्यान, ही दुर्देवी घटना घडलीय. या घटनेनंतर पाळधी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करण्यास सुरु केल्याचे सांगण्यात येत आहे. 

    follow whatsapp