नागपूर हादरलं! नराधमांनी 13 वर्षीय मुलीला OYO हॉटेलवर नेत लैंगिक शोषण केलं, नंतर व्हिडिओ रेकॉर्ड करत...

योगेश पांडे

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाणे परिसरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना आहे. या घटनेनं नंदनवन पोलीस ठाणे परिसर हादरून गेला आहे.

ADVERTISEMENT

Nagpur Crime
Nagpur Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाणे परिसरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

point

आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Nagpur Crime : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाणे परिसरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना आहे. या घटनेनं नंदनवन पोलीस ठाणे परिसर हादरून गेला आहे. दोन मित्रांनी मिळूनच हे हैवानी कृत्य केलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी दोघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव करण रामटेके आणि रोहित सोनवणे असे आहे. 

हे ही वाचा : चला पुण्याला म्हणत पहाटे साडे तीन वाजता लिफ्ट दिली, रस्त्यात गाडी थांबवून महिलेला झाडीत नेलं, नको तेच... लाज आणणारी घटना

आरोपींनी पीडितेला ओयो हॉटेलमध्ये नेले आणि...

संबंधित प्रकरणात आरोपी आणि पीडिता एकमेकांना ओळखत असल्याची माहिती आहे. आरोपींनी पीडितेला शहरातील बिडगाव येथील परिसरात ओयो हॉटेलमध्ये नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यांनी हॉटेलवरचे व्हिडिओ देखील रेकॉर्ड केले आहेत. जर या प्रकरणाबाबत कोणाला काही सांगितल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येतील अशी धमकीही देण्यात आली. 

आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

आरोपींनी पीडितेला ओयो हॉटेलमध्ये सोडून तिथून पळ काढला. पीडितें तिच्या कुटुंबाला घटनेची एकूण माहिती दिली, त्यानंतरच नंदनवर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणात आरोपीचे नाव करण रामटेके आणि रोहित सोनवणे या दोन्ही आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे ही वाचा : मोठी बातमी: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला वेगळंच वळण; आरोपी पीएसआय गोपाळ बदने पोलिसांना शरण...

नंदनवन पोलिस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. आरोपींवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून देशात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना अधिक वाढू लागल्याचे चित्र आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp