चला पुण्याला म्हणत पहाटे साडे तीन वाजता लिफ्ट दिली, रस्त्यात गाडी थांबवून महिलेला झाडीत नेलं, नको तेच... लाज आणणारी घटना

मुंबई तक

pune crime : पुणे ग्रामीण विभागात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका महिलेला जबरदस्तीने गाडीत बसवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

ADVERTISEMENT

sexually assaulted
sexually assaulted
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुणे ग्रामीण विभागात एक धक्कादायक प्रकार

point

पुण्याला सोडतो असं सांगत महिलेला झाडीत नेलं आणि...

Pune Crime : पुणे ग्रामीण विभागात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका महिलेला जबरदस्तीने गाडीत बसवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जाक्या कोंडक्या चव्हाण (वय 30) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. संबंधित घटना ही मळद गावानजीक 10 ऑक्टोबर रोजी पहाटे साडेतीन वाजता  घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : बुध ग्रहाच्या उदयामुळे 'या' राशीतील लोकांना आर्थिक लाभ आणि यश मिळणार

पुण्याला सोडतो असं सांगत महिलेला माटोरसायकलवर बसवलं नंतर...

पीडित महिला ही भिगवण येथून पुण्याकडे निघाली असता, ती गाड्यांची वाट बघत होती. तेव्हा तिला एका तरुणाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवर बसण्यास सांगितलं. त्यानंतर तरुणाने महिलेला मळद गावातील हद्दीतील रेल्वे पुलाजवळ थांबवून महिलेवर रोडलगतच्या एका झाडीत नेलं आणि लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिला तिथेच सोडून दिलं. या धक्कादायक घटनेनंतर महिलेनं भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. 

आरोपी जाक्या कोंडक्या चव्हाणला पोलीस कोठडी

संबंधित प्रकरण लक्षात घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीचे वर्णन करून चित्र तयार करण्यात आले. भिगवण, दौंड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पथके तयार करण्यात आली. या प्रकरणात त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, अद्यापही घटनेची खोलवर माहिती मिळालेली नाही. दरम्यान, पोलिसांनी रेखाचित्राच्या आधारे जाक्या कोंडक्या चव्हाणला लिंगाळी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने 26 ऑक्टोबर पोलीस कोठडी सुनावली. 

हे ही वाचा : 8 वर्षे दोघांचीही प्रेमकहाणी, लग्नही ठरलं, पण अशी काय मागणी केली होती, ज्यामुळे तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर, तसेच दौंड पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ पवार, भिगवण पोलीस ठाण्याचे सहय्यक निरीक्षक विनोद महागडे यांच्या पथकाने ही कारवाई केल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp