8 वर्षे दोघांचीही प्रेमकहाणी, लग्नही ठरलं, पण अशी काय मागणी केली होती, ज्यामुळे तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल
crime news : दोघांचेही गेली आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही लग्न करणार होते, पण तरुणाने तरुणीला अशी काही मागणी केली ज्यामुळे तिने टोकाची भूमिका घेतली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तरुणीने 'त्या' कारणावरून लग्नास दिला नकार
आठ वर्षे प्रेम करून का घेतला यु टर्न?
अपमानित तरुणीचं टोकाचं पाऊल
Crime News : तरुणाचं तरुणीवर गेली आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनीही एकमेकांच्या लग्नाला संमती दिली होती. पण तरुणीने लग्नात हुंडा न देण्याबाबत सांगितलं असता, तरुणाने लग्नास थेट विरोध दर्शवला. यानंतर तरुणी तरुणाच्या घरी गेली आणि तिनं विषप्राशन केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे प्रकरण बारादकी पोलीस ठाणे परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : बुध ग्रहाच्या उदयामुळे 'या' राशीतील लोकांना आर्थिक लाभ आणि यश मिळणार
तरुणीच्या वडिलांचा धक्कादायक आरोप
या प्रकरणात तरुणीच्या वडिलांनी आरोप केला की, माझ्या मुलीचे जवळच राहणाऱ्या कासिम नावाच्या तरुणासोबत गेली आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांना एकमेकांसोबत लग्न देखील करायचे होते. चार वर्षांपूर्वी, जेव्हा या घटनेची माहिती समोर आली असता, तेव्हा दोन्ही कुटुंबियांनी नात्याला परवानगी दिली होती.
काही काळानंतर दोन्ही कुटुंबात मतभेद निर्माण झाले आणि संबंध तुटले. सुमारे तीन महिन्यांपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा चर्चा सुरु झाली आणि लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली. तेव्हा कासिमने आणि त्यांच्या कुटुंबियांनी हुंड्यात स्पोर्ट्स बाईकची मागणी केली. मुलीच्या वडिलांनी आरोप केला की, त्यांनी आर्थिक अडचणींमुळे ही मागणी पूर्ण करण्यास नकार दिला. यामुळे संपातपलेल्या कासिमच्या कुटुंबियांनी पुढे लग्न सोहळ्याला नकार दिला होता.
मानसिक तणावाला बळी पडून तरुणीचं विषप्राशन
शनिवारी, तरुणीला याचा त्रास झाला. ती एकटीच कासिमच्या घरी गेली आणि त्याच्या आईशी बोलू लागली होती. त्यानंतर त्यांच्यात वाद होऊ लागला. तरुणीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच सर्व प्रकरणात तरुणीने मानसिक तणावाला बळी जाऊन विष प्राशन केले. शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाने याबाबतची माहिती तरुणीच्या कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर कुटुंबाने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.










