CBSE Board Result 2025: CBSC बोर्डाच्या परीक्षार्थींना त्यांच्या निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. विद्यार्थी त्यांच्या बोर्ड परीक्षेच्या निकालाची अगदी आतूरतेने वाट पाहत आहेत. लवकरच CBSE बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. हा निकाल मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात लागणार असल्याची शक्यत वर्तवली जात आहे. मात्र, निकालाच्या नेमक्या तारखेची अधिकृत घोषणा अद्याप केली नाही.
ADVERTISEMENT
यावर्षी सुद्धा CBSE बोर्डाच्या इयत्ता 10 वीच्या परीक्षा या 15 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. तसेच, इंटरमीडिएट बोर्डाच्या परीक्षेचं आयोजन 15 फेब्रुवारी ते 4 एप्रिल 2024 पर्यंत केलं गेलं होतं. लवकरच, निकालाच्या तारखेची माहिती अधिकृत वेबसाइटवर येईल.
कधी येऊ शकतो निकाल?
मीडिया रिपोर्टनुसार, मागील वर्षांच्या ट्रेंड्सकडे पाहता CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वी इयत्तेचा निकाल हा मे महिन्यातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो. तसेच काही सूत्रांच्या मते, बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 15 मे या कालावधी पर्यंत लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, बोर्डाच्या सर्व परीक्षार्थींनी निकालाच्या अधिकृत वेबसाइटवर लक्ष देणं गरजेचं आहे.
हे ही वाचा: ICSE च्या 10 वी आणि ISC च्या 12 वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'इथे' पाहता येईल Result
कसा आणि कुठे पाहाल निकाल?
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी निकालाच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच cbse.gov.in, cbseresults.nic.in किंवा results.cbse.nic.in वर जाऊन मार्कशीट पाहू शकता. यासाठी रोल नंबर, शाळा क्रमांक आणि जन्मतारीख यासारख्या डिटेल्सची गरज असते. विद्यार्थी UMANG अॅप आणि DigiLocker मध्ये जाऊन आपली मार्कशीट डाउनलोड करू शकतात.
तब्बल 42 लाख विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार
यावर्षी जवळपास 42 लाख विद्यार्थ्यांनी CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वी इयत्तेची परीक्षा दिली आहे. त्यांचा निकाल आता काही दिवसांतच जाहीर होणार आहे. उत्तरपत्रिकांच्या तपासणीची प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली आहे आणि निकालाची तयारी सुद्धा आता अंतिम टप्प्यात आहे.
हे ही वाचा: अरे व्वा! आता अक्षय्य तृतीयेला सोन्याचे दर घसरले? 22 कॅरेटचे रेट काय?
अधिकृत माहिती लवकरच येईल
परीक्षेसंबंधी कोणत्याच अफवांवर विश्वास न ठेवता त्यांच्याकडे दुर्लक्ष करून केवळ CBSE च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीकडे लक्ष देत राहा. तसेच, काही विश्वसनीय स्त्रोतांकडून यासंबंधी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. निकालाबाबतीत ताज्या आणि नवीन माहितीसाठी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला नियमित भेट देत राहा.
ADVERTISEMENT
